आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • ChatGPT Will Increase Prosperity, Human Creativity Will Flourish; But Misinformation Will Spread Faster

तंत्रज्ञान:चॅटजीपीटीमुळे समृद्धी वाढेल, मानवी सर्जनशीलता बहरेल; परंतु चुकीची माहिती अधिक वेगाने पसरेल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केड मेट्झ मानवी मेंदूप्रमाणे काम करणाऱ्या चॅटजीपीटी या मशीनच्या भविष्यावर सध्या बरीच चर्चा होत आहे. गेल्या आठवड्यात हजारो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ओपनएआय आणि इतर कंपन्यांना चॅटजीपीटीसारख्या सिस्टिमवर काम थांबवण्याची विनंती केली. अनेक औद्योगिक नेते, एआय संशोधक चॅटजीपीटीला वेब ब्राउझर किंवा आयफोनसारखा महत्त्वाचा तांत्रिक बदल मानतात. काही म्हणतात, यामुळे मानवता नष्ट होईल. दुसरीकडे चॅटजीपीटी सादर करणारी कंपनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांना विश्वास आहे की, नवीन तंत्रज्ञान जगात समृद्धी आणेल. पण, त्यातून होणाऱ्या नुकसानीबद्दल ते चिंतितही आहेत.

२०१९ मध्ये ऑल्टमन यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराशी पहिल्या भेटीत सांगितले की, आर्टिफिशियल जनरेटिव्ह इंटेलिजन्स (एजीआय) इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा जगात अधिक समृद्धी आणेल. त्या वेळी मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वी ओपनएआयमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे मान्य केले होते. ऑल्टमन यांना भीती होती की, त्यांच्या कंपनीचे तंत्रज्ञान चुकीची माहिती पसरवणे, नोकरीच्या बाजारपेठेला हानी पोहोचवणे आणि जगाचा नाश करणे यांसारखे गंभीर नुकसान करू शकते. २०२३ मध्येही ऑल्टमन असेच काही तरी सांगतात.

३७ वर्षीय ऑल्टमन यांनी गेल्या आठवड्यात टाइम्सला सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता दोन्ही दिशांनी कार्य करते. ती अकल्पनीय आणि आश्चर्यकारक पराक्रम करू शकते. तथापि, आम्ही नुकसान निष्फळ करण्याचे मार्गही शोधू शकतो. त्यांना तंत्रज्ञानाच्या असंख्य शक्यतांचा समतोल साधण्याची आशा आहे. आमच्या कंपनीचे तंत्रज्ञान काही गंभीर समस्या सोडवेल, राहणीमान सुधारेल, मानवी इच्छाशक्ती आणि सर्जनशीलतेचा अधिक चांगला वापर करेल, असे ऑल्टमन म्हणतात. त्यांचा युक्तिवाद आहे की, चॅटजीपीटीने शक्यतांचे प्रारंभिक संकेत दिले आहेत. तथापि, हे तंत्रज्ञान हुकूमशाही सरकारच्या हातात आले तर ते गंभीर नुकसान करेल. नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आलेले चॅटजीपीटी माणसाप्रमाणे मजकूर टाइप करू शकते. प्रश्नांची उत्तरे देते. त्याच्यासाठी अनेक जटिल प्रकल्पांची रचना करणे शक्य आहे. यानंतर आलेले चॅटजीपीटी ४ आणखी काम करू शकते.

सॅम ऑल्टमन हे वेगाने वाढणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीचे उत्पादन आहे. वाय काॅम्बिनेटरचे अध्यक्ष म्हणून आॅल्टमॅन यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान एअरबीएनबी, रेडिट आणि स्ट्राइप यासह अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. यासह त्यांनी ओपन एआयसह अनेक प्रकल्पांवर काम करण्यास सुरुवात केली. ओपन एआयमधील संशोधन वेगवान झाल्यावर ऑल्टमनने २०१९ मध्ये वाय कॉम्बिनेटर सोडले. एका वर्षात १०० पेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या ना-नफा ओपन एआयला नफ्यात बदलले. सॅम स्वत: मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी केव्हिन स्कॉट यांच्याशी कराराबद्दल बोलले. यावर्षी जानेवारीपर्यंत मायक्रोसॉफ्टने ओपन एआयमध्ये ९० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. करारानुसार ओपन एआय व मायक्रोसॉफ्ट सर्च इंजिन, ई-मेल अॅप्लिकेशन, ऑनलाइन ट्यूटरसह अनेक उत्पादने तयार करतील. या उपक्रमांच्या जलद गतीने वर्षानुवर्षे तंत्रज्ञान क्षेत्र पाहणाऱ्या लोकांनाही आश्चर्यचकित केले आहे. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग यांच्याबद्दल लोक ज्या प्रकारे बोलतात त्याचप्रमाणे ऑल्टमॅनबद्दलही बोलले जाईल, असा विश्वास मायक्रोसॉफ्टच्या स्कॉट यांना वाटतो.