आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आम्ही जे करू-ठरवू मुलेही त्याच गतीने ते शिकतील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी सकाळी मी व्हॉट्सअॅपवर एका मिनिटाचा एक व्हिडिओ बघितला. यात पाकिस्तानी कवी फय्याज हाश्मींनी लिहिलेले आणि प्रसिद्ध पाकिस्तानी संगीतकार सोहेल राणांनी संगीतबद्ध केलेले गाणे ‘आज जाने की ज़िद न करो…’ वाजत होते. आवाज शास्त्रीय गायक हबीब वली मोहंमद यांचा होता. त्यांनी १९७३ मधील हिट पाकिस्तानी चित्रपट ‘बादल और बिजली’मध्येही हे गाणे गायले होते. परंतु व्हिडिओतील दृश्ये काळीज पिळवटणारे होती. यात वेगवेगळ्या घरातील एक ते चार वर्षांपर्यंतची मुले दिसत होती. कोणालाच वाटत नव्हते की, श्री गणेशाचे विसर्जन व्हावे. ते बाप्पांना घरातून जाऊ देत नव्हते किंवा कृत्रिम तलावात बुडवू देत नव्हते. त्यांचे श्रीगणेशावर पाचपेक्षाही कमी दिवसांत प्रेम जडले होते. ते बाप्पांना घट्ट पकडून जिद्दीला पेटले होते. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू बघून कोणीही दु:खी व्हावे. मी फोन घरी ठेवून वॉकिंगला निघालो. मुले पाच दिवसांतच कसे ईश्वराची भक्ती आणि प्रेम शिकतात असा विचार सुरू होता. आपण मुलांसमोर असे काही करत असू तेव्हा ते लवकर शिकतच नाही तर आम्ही आपल्या घरी पूजेच्या रूपात देतो तसा ते ईश्वराचा सन्मानही करतात. माझ्यासाठी मुलांचे हे अश्रू आपल्या रचनाकाराविषयी खरी भक्ती होती. मुले पाच वर्षांची होईपर्यंत आपल्या आईवडिलांव्यतिरक्त इतर कुणाला ओळखत नाहीत. आईवडील गणेशजींसमोर वाकून, त्यांच्या आगमनाचा उत्सव साजरा करतात तेव्हा मुलांना वाटते की रचनाकार आपल्या आईवडिलांपेक्षाही मोठा आहे. माझे मन त्या व्हिडिओत हरवले असतानाच एका तीन वर्षांच्या मुलीला आपल्या आजीचा हात पकडून माझ्यासमोर जाताना बघितले. मुलीने आजीला जवळच उमललेले गुलाबाचे फूल मागितले. आजींचा हात गुलाबापर्यंत पोहोचत नव्हता. कारण तो अंगणाच्या भिंतीपासूनही वर होता. मला वाटले ती माझी मदत मागू शकेल. त्यामुळे मी कानाला हेडफोन लावून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत झपाट्याने चालू लागलो. हा परिसर माझ्यासाठी नवीन होता आणि मी माझ्या एका मित्राच्या बंगल्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तेथे थांबलो असल्याने असे केले. कारण मित्र अमेरिकेत राहतो. जेव्हा रस्त्याच्या शेवटी पोहोचलो तेव्हा गलबला ऐकून मी मागे वळून बघितले. तेथे एक सायकलस्वार त्या आजी आणि मुलीच्या मदतीला थांबला होता. आजींनी फूल तोडण्याचा प्रयत्न करताच आतून कुत्रा जोरात भुंकत आल्याने सायकलस्वार भिंतीवरून पडला होता. सायकलवाला भिंतीवर चढल्याने घरमालकही ओरडत होता. घरमालक तब्येतीने तगडा आणि पिळदार मिशावाला माणूस होता. तेथील पूर्ण चित्रच बिघडले होते. येणारे-जाणारे आपले मत मांडत होते की, कोण खरे आणि कोण खोटे. काही जण तर व्हिडिओ बनवत होते. जर आजीबाईंनी नातीला घरमालकाच्या परवानगीशिवाय फूल तोडणे योग्य नाही हे आधीच शिकवले असते तर मुलीने फुलासाठी हट्ट केला नसता.

फंडा असा की, चूक केल्यावर दरवेळी मुलांनाच दोष देऊ नका. आपण मुलांना जसे शिकवू पाहत आहोत तसे आपणही केले असते का, असा स्वत:ला प्रश्न करा. जर असे असे झाले तर मुले खूप आधीच नैतिकता शिकली असती.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...