आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अंतरंग:चीनची ढासळती आर्थिक प्रकृती - २

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापार, गुंतवणूक आणि नवनवीन उपक्रमांद्वारे इतर विकसनशील अर्थव्यवस्थांवर चीनचा वाढता प्रभाव आहे. खरे तर नवीन प्रो-ग्रोथ धोरणांसाठी चीनच्या नेत्यांवर आधीच दबाव निर्माण होत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या २०व्या नॅशनल काँग्रेसमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनचे सार्वभौम नेते बनण्याची शक्यता असल्याने नवीन धोरणांना सध्या होणारा प्रतिकार कमी होण्याची शक्यता आहे. मात्र तीन दशकांच्या नेत्रदीपक आर्थिक वाढीनंतर चीनची अर्थव्यवस्था मंदीकडे झुकत आहे आणि तज्ज्ञांच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थेकडून अधिक परिपक्व आणि विकसित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक जटिल विकासाभिमुख आव्हाने आहेत, जी इतर देशांशी संबंधित आहेत. एकूणच कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेनेदेखील कडेचे टोक गाठले असताना बीजिंगच्या नेतृत्वाला कर्ज देण्याच्या आणि शून्य-कोविड धोरणावर धोकादायक परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. गृहनिर्माण बाजारपेठेची जगाने पाहिलेली सर्वात मोठी घसरण रोखण्याच्या लढाईत चीन आता अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, जिथून परतीची वाट नाही. तज्ज्ञांच्या मते, देशाच्या कम्युनिस्ट नेतृत्वासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा एक धोकादायक क्षण निर्माण झाला आहे. मागणी वाढवण्यासाठी बीजिंगने अधिकाधिक औद्योगिक धोरणे आणि उपाययोजना राबवाव्यात असे अनेकांचे मत असले तरी ती वेळ निघून गेली आहे असेच वाटते आहे. एकेकाळी गृहनिर्माण बाजारपेठेवरील सामान्य जनतेच्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेल्यामुळे आणि बीजिंगच्या कठोर शून्य-कोविडच्या धोरणामुळे चीनची आर्थिक व्यवस्था मंदीच्या काठावर पोहोचली आहे. त्यात आलेली अति उष्णतेची लाट, जी वीज आणि अन्नपुरवठ्यावर परिणाम करत आहे.

चिनी गृहनिर्माण बाजाराने गेल्या दोन दशकांपासून वाढ केली आहे आणि आता जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता वर्गाचे ती प्रतिनिधित्व करते, ज्याचे मूल्य अमेरिकन स्टॉकच्या एकूण भांडवलीकरणापेक्षा मोठे आहे. बाजार, सुलभ कर्जापासून वंचित राहिल्यानंतर, आता बिल्डर्सचे दिवाळे निघत आहेत, किमती घसरत आहेत, अपूर्ण राहिलेल्या घरांच्या कर्जाची परतफेड करण्यास लोक नकार देत आहेत आणि विकल्या जाणाऱ्या मालमत्तेतील घसरण आणि बांधकाम उत्पन्नासाठी जमीन विक्रीवर अवलंबून असलेल्या स्थानिक सरकारांना अपंग करत आहेत. दुसरीकडे ग्रामीण बँकांच्या चुकांमुळे आणि तारण पेमेंटवर बहिष्कार टाकल्याने चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसलाय. एप्रिल २०२२ मधे, ह-नान प्रांतातील चार ग्रामीण बँकांनी सुमारे सहा अब्ज डॉलर्स एवढ्या किरकोळ ठेवी गोठवण्याची घोषणा केली. चीनमधील मंदीचे पडसाद जागतिक आर्थिक क्षेत्रावर उमटण्यास सुरुवात झाली आहे. पुरवठा आणि मागणी या दोन्ही घटकांच्या संतुलनावर अवलंबून असलेली जागतिक अर्थव्यवस्था, मंदीच्या दिशेने वेगाने जाते आहे. चीनच्या वेगवान आर्थिक विकासाने संस्थात्मक विकासाचा वेग केव्हाच ओलांडला आहे. परंतु त्यांच्या संस्थात्मक विकास आणि सुधारणांमध्ये खूप तफावत आहे, जी चीनने उच्च दर्जाचा आणि शाश्वत वाढीचा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी दूर करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारची भूमिका विकसित होणे आवश्यक आहे आणि स्थिर बाजार अपेक्षा आणि स्पष्ट आणि नि:पक्ष व्यवसाय वातावरण प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणे तसेच बाजारव्यवस्थेला आणखी समर्थन देण्यासाठी नियामक प्रणाली आणि कायद्याचे नियम मजबूत करणे आवश्यक आहे. अशा बदलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक संधींची असमानता कमी करणे. सरकारने समान समृद्धी साध्य करणे हे प्रमुख आर्थिक उद्दिष्ट ठळकपणे मांडले आहे, परंतु हे लक्ष्य गाठण्यासाठी अद्याप विशिष्ट धोरणे परिभाषित केलेली नाहीत. खरे तर २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीचा तारणहार चीनच होता. पण या वेळेस ही शक्यता सर्वतोपरी नसल्याने आज संपूर्ण जगाची आर्थिक व्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्याचे निराकरण करणे हे चीनच्या हातात नक्कीच नाही.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...