आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:करिअर निवडणे होईल सोपे

टीम मधुरिमा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच बारावीचे निकाल लागले. बहुतांश वेळा करिअरची वाट पालकांच्या, शिक्षकांच्या सल्ल्यानुसार किंवा मित्रमैत्रिणींचे अनुकरण करून निवडली जाते. मात्र, बहुतांश वेळा अशी निवड चुकते. आपल्या पाल्याचे काही स्वभावविशेष लक्षात घेतले, तर पालकांना पाल्यांच्या करिअरची दिशा निवडणे सोपे जाऊ शकते.

गणित : तर्कबुद्धीने निर्णय घेणं, संख्या स्वत: समजून घेऊन इतरांनाही समजावून सांगणं, नफ्या-तोट्याबद्दल जाणून घेणं, एखाद्या कामासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज लावणं असे गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणित, संख्या, आकडे याच्याशी संबंधित करिअर निवडावे. यात इंजिनिअरिंगशी संबंधित विषय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर, डाटा अॅनालिसिस, अॅस्ट्रोफिजिक्स, आर्मी, ऊर्जेशी संबंधित क्षेत्रांचा समावेश होतो.

जैवविज्ञान : एखाद्यावर उपचार करणे, न्यूरो, मेंदू इ. बद्दल जाणून घेणे, कुतूहल असणे, स्वत:च्या कामाबद्दल संवेदनशील असणे, प्रत्येक काम व्यवस्थित करणे असे स्वभावगुण असणारे विद्यार्थी जैवविज्ञान विभागाच्या आरोग्य आणि चिकित्सा क्षेत्रात यशस्वी होतात. बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र ही काही यातली करिअर क्षेत्रं.

वाणिज्य : आर्थिक व्यवस्थापन, प्रतिकूल परिस्थितीत उपाय शोधणं, तत्परतेने काम करणं, नवीन काम लवकर शिकणं यासारखे स्वभावविशेष असणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर केल्यास चमकू शकतात.

कला : सामाजिक क्षेत्राची, नवीन शिकण्याची आवड असणारे विद्यार्थी कला क्षेत्रात यशस्वी होतात. नृत्य, संगीत, चित्रकला, गायन-वादन इ. चा या विभागात समावेश होतो. कला शाखेत प्रवेश घेतल्यास इतिहास, भाषा, भूगोल, मानसशास्त्र इ. मध्ये करिअर संधी आहेत.

लक्षात घ्यावे असे...
अनवाणी चालणे
घरांमध्ये फरशा थंड पडत असल्यामुळे स्लिपर वापरण्याची पद्धत आहे. याचबरोबर दररोज काही मिनिटे अनवाणी पायांनी जमिनीवर, मातीवर, गवतावर चालणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. जमीन, माती, गवतावर अनवाणी चालल्याने रक्तप्रवाह सुधारतो. शरीराला ऑक्सिजन मिळतो. पायांचे स्नायू सक्रिय होतात. पायांवर आणि तळव्यांवर पडणारा दाब अॅक्युप्रेशरचं काम करतो.

बातम्या आणखी आहेत...