आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाॅमरसेट माॅमची एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘जग विचित्र आहे. इथे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी अशी प्रत्येक गोष्ट करते, जी इतर कुणी केल्यास त्याच्यावर टीका होते.’ आपण सरकार, समाज आणि शेजाऱ्यांकडूनही प्रत्येक प्रकारच्या नैतिकतेची अपेक्षा करतो, पण स्वतः अशाच प्रकारची बेफिकीर कृती करतो. दिल्लीजवळ एका मुलाला शेजारच्या कुत्र्याने असे चावे घेतले की त्याला ४० टाके घालावे लागले. बेजबाबदार व्यक्तीने विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने भीषण अपघात झाला, त्यामध्ये डझनभर लोक ठार किंवा जखमी झाल्याच्या बातम्या दररोज येत असतात. रात्रभर पार्ट्यांमध्ये दारू पिऊन सकाळी फिरायला जाणाऱ्यांना पायदळी तुडवत निघून जाणे ही नेहमीची घटना आहे. प्राण्यांवर प्रेम करा, पण शेजाऱ्याशी असलेल्या नातेसंबंधालाही महत्त्व द्या. लोकांचे स्वातंत्र्य हा कोणत्याही आधुनिक शासन व्यवस्थेचा पाया असतो, पण त्यासोबतच लोकांचे चैतन्यही त्या अनुषंगाने उन्नत ठेवणे ही स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची पूर्वअट असते. प्राणीप्रेमी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालतात, पण त्यांची संख्या नियंत्रित करणे ही पालिकेसाठी नवीन समस्या झाली आहे. कुत्र्यांना फिरवणे आणि घाबरलेल्या लोकांना ते चावणार नाहीत, असे सांगणे म्हणजे माणसापेक्षा कुत्र्याच्या विवेकावर जास्त विश्वास ठेवणे होय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.