आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचन टिप्स:तांब्याच्या-काचेच्या भांड्यांची स्वच्छता

टीम मधुरिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांब्याची आणि काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. जाणून घेऊयात काही टिप्स, ज्यामुळे अशी भांडी स्वच्छ करण्याचा वेळ वाचवता येईल.

रोजच्या वापरासाठी, पाणी साठवण्यासाठी, पुजेसाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या भांड्यांवर डाग पडतात. हवेच्या संपर्कात आल्यामुळे कितीही घासून स्वच्छ केलं, तरी हे डाग लवकर निघत नाहीत. परिणामी अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. काचेची भांडी जपून हाताळावी लागतात. रोजच्या वापरातली असली, तर त्यांची रोज सफाई करावीच लागते.

तांब्याची भांडी एका वाटीमध्ये दोन लहान चमचे मीठ, दोन छोटे चमचे लिंबूसत्त्व यामध्ये एक ग्लास पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार करा. तांब्याच्या लहान भांड्यांमध्ये हे मिश्रण टाकून आणि मोठ्या भांड्यांना हे मिश्रण मऊ घासणीवर घेऊन तांब्याची भांडी स्वच्छ करा. डाग निघाल्यानंतर ही भांडी साध्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. सुती कापडाने पुसून घ्या. काचेची भांडी सकाळ-संध्याकाळच्या चहानंतर गाळून उरलेली चहा पावडर एका वाटीत घ्या. या चहा पावडरमधून वेलची किंवा इतर मसाला असल्यास तो काढून टाकून चहा पावडर साफ करून घ्या. साफ केलेल्या चहा पावडरमध्ये जवळपास दोन ग्लास पाणी टाकून उकळून घ्या. हे पाणी उकळल्यानंतर गाळून घेऊन चहा पावडर वेगळी काढून पाणी थंड होऊ द्या. आता एक चमचा बेकिंग सोडा आणि एक छोटा चमचा भांडी धुण्याचा लिक्विड सोप या पाण्यात एकत्र करून मग या मिश्रणाने काचेची भांडी स्वच्छ करा.