आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:निकालानंतरची परीक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर अखेर दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्यातील नऊ विभागांचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला. यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. निकालाची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. मात्र, त्यातून फार काही साध्य होणार नाही. याचे कारण आता पुढे काय? कारण एक तर हा परीक्षेविना लागलेला निकाल आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळांनी कसे केले हे महत्त्वाचे आहे. ‘सीबीएसई’ शाळांनी मूल्यमापनाची एक समिती गठीत केली होती. त्यात शिक्षकांपासून पालकही होते. मात्र, त्यातही शाळांनी गडबड केली. टॅब्युलेशन फॉर्म्युल्याच्या रेफरन्स रेंजचा मनमानी वापर करत विद्यार्थ्यांना सढळ गुणदान केले. शाळेची कामगिरी सुधारण्यासाठी हा घाट घातला. मात्र, या शाळांची मूल्यांकन प्रक्रियाच ‘सीबीएसई’ बोर्डाने फेटाळली. मूल्यांकनात बदल करा, अन्यथा आम्हीच स्वतःहून मूल्यांकन करू, अशी तंबीही दिली.

एकंदरीत, निकालापूर्वीच या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मग या मुलांचे पुढे काय होणार? त्यांना प्रवेशाच्या संधी मिळतील, पण तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी डावलल्या जाऊ नयेत. बोर्ड कुठलेही असो, विद्यार्थ्यांवर कोविड काळातील उत्तीर्णतेचा शिक्का बसता कामा नये. त्यासाठी सरकारने आत्ताच धोरण ठरवावे. ते लवकर जाहीरही करावे. सोबत अनेक मुले अंतर्गत मूल्यमापनात सहभागी झाले नाहीत. त्यांच्या परीक्षा कधी आयोजित करणार, हेही निश्चित करावे. अन्यथा, त्यांचेही वर्ष वाया जाईल. सरकार, शिक्षण विभागाने दहावीच्या निकालाने निर्माण झालेले हे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत. एका अर्थाने आता सरकारची परीक्षा सुरू झाली आहे. त्यात ते कसे उत्तीर्ण होते, ते पाहायचे.

बातम्या आणखी आहेत...