आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाऱ्याची दिशा बदलली तर उत्तर भारतातील बिहार, झारखंडमधील उष्णताही ईशान्येकडून विदर्भात येत असते. त्यामुळे विदर्भात उष्णता वाढत आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट असून, ती कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट होती. मात्र गुरुवारपासून विदर्भ आणि मराठवाडा वगळता अन्य ठिकाणी कमाल तापमान कमी झाले होते. भविष्यात मार्च ते मे हा तीन महिन्यांचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खूप बदल घडवून आणू शकतो, असे वातावरण आहे. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा हा स्थानिक पातळीवर बदलत असतो, दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्येकडून गुजरात, अरबी समुद्रावरून वारे उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडवले जातात. त्यामुळे उष्णतेची लाट कोकणामध्ये तर महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा अधिक जाणवली. हेच गत चार ते पाच दिवसांत दिसून आले. आगामी आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांतील भागात उष्णता जाणवणार आहे.
यावर्षी भारतात पश्चिम प्रकोपाचा मारा सतत सुरू असल्याने उत्तर भारतासह महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्येही गारवा जाणवत होता. अचानकपणे उत्तरेकडून वाहणारे उष्ण वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात १५ ते २० मार्चपर्यंत उष्णता जाणवते. आगामी तीन दिवस विदर्भात उष्णता जाणवणार आहे. मात्र यादरम्यान दक्षिण भारतात कमी दाबाचे पट्टे ५ ते ७ डिग्री अक्षवृत्त दरम्यान निसर्गत: तयार होत असतात. त्यामुळे वायव्येकडील उष्ण वारे समुद्रसपाटीपासून कमी उंचीच्या भागातून विदर्भात वेगाने उतरतात. वाऱ्याची दिशा बदलली तर उत्तर भारतातील बिहार, झारखंडमधील उष्णताही ईशान्येकडून विदर्भात येत असते. त्यामुळे विदर्भात उष्णता वाढत आहे. सध्या महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा मराठवाडा अधिक तापला आहे.
सरासरी समुद्रसपाटीच्या उंच महाराष्ट्रातील चार प्रमुख उपविभागांत कोकणात कमी तर मध्य महाराष्ट्रात जास्त असल्यामुळे उष्णता कमी जास्त असा फरक विभागवार होत आहे. शहरांत सजीव व निर्जीव इन्फ्रास्ट्रकचरमुळे घनता वाढत असल्याने उष्णता वाढते. राज्यात उष्ण महिना मे समजला जातो, त्या महिन्यात सरासरी तापमान ३१ अंश सेल्सिअस असते. महाराष्ट्रातील थंड महिना जानेवारी असून, सरासरी तापमान २४ अंश सेल्सिअस असते. राज्यात वेगवान वारे हे जुलै महिन्यात वाहतात. त्यांचा वेग साधारण ताशी ८ मैल असतो. मे महिन्यात सरासरी दिवसा प्रकाशाचे तास हे १२.९ असतात, तर त्यातही प्रत्यक्षात सरासरी सूर्यप्रकाश हा ९.७ तासच मिळतो. राज्यात आगामी काळात वातावरण उष्ण राहणार, असे दिसत असले तरी त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
माणिकराव खुळे
हवामान तज्ज्ञ, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.