आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्ती-यारी:सहवास की घात?

टीम मधुरिमा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण समान वागणूक आणि विचारसरणीच्या आधारावर मित्र निवडतो, परंतु नात्यात एकमेकांबद्दल आदर, सकारात्मक भावना नसेल तर त्याच्यापासून अंतर ठेवणे कधीही चांगले.

आपले मित्र किंवा आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो ते आपल्यासाठी खास असतात. त्यांच्यावर विश्वास असतो म्हणूनच आपल्या मनातील कित्येक गोष्टी त्यांना सांगतो. पण, ज्याला तुम्ही तुमचा सोबती किंवा जवळचा मित्र म्हणून निवडले आहे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल सारखीच भावना, विचार आहेत का? त्याचे तुमच्याबद्दलचे वागणे आणि विचार हे सर्व सांगून जातात. तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे.

दुर्व्यवहार करत असेल तर : जर तुमचा सोबती किंवा मित्र तुमची प्रत्येक गोष्टीवर खिल्ली उडवत असेल, तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमच्या कमतरतेची खिल्ली उडवत असेल तर असे लोक तुमचे हितचिंतक असू शकत नाहीत. असे लोक तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. गुन्हेगार असल्याचे सांगतो मित्रांशी भांडणं, वाद हे होतच असतात.पण दोन लोकांच्या भांडणात तिसऱ्याला मध्ये आणून मित्राला दोषी ठरवणं योग्य नाही. असे लोक इतरांसमोर आपली प्रतिमा सकारात्मक ठेवतात आणि सर्व दोष मित्रावर टाकतात.

खोटे बोलतात आपल्याला असे वाटते की, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांना आपण आपले जवळचे समजतो, ते नेहमी आपल्याला खरं सांगतात, परंतु ते तुमच्याशी खोटे बोलत असतील किंवा गोष्टी लपवत असतील तर अशा लोकांपासून दूर राहणे चांगले.

मत्सर करणारे असतात काही लोक स्वतःला जवळच्या मित्राचे शुभचिंतक म्हणून सांगतात. मित्रांच्या आनंदात आनंदी असल्याचे ते भासवतात. पण असे लोक तुमच्या यशाची चर्चा करत नाहीत. ही मत्सर वाटण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...