आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Collective Fight Against Corruption Is Necessary | Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:भ्रष्टाचाराच्या विरोधात सामूहिक लढा आवश्यक

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यातील मूलभूत फरक असा की, पहिला राज्यकारभारातील स्वातंत्र्याचा आहे, तर दुसरा सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे पहिल्यात पंतप्रधानांचे उद्बोधन व सरकारच्या दिशेसोबतच काही प्रमाणात आधीच्या सरकारांवरील आक्षेप. असतात, तर दुसरा पूर्णपणे सार्वभौम राष्ट्राच्या मागण्या प्रतिबिंबित करतो आणि केंद्रस्थानी राष्ट्रपती असतात. परंतु, या वेळी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांचे भाषण मुख्यत्वे अराजकीय आणि सामाजिक सुधारणांचे घटक असलेले होते. महत्त्वाकांक्षी लोक, सामूहिक चेतनेचा उदय व भारताकडून जगाच्या अपेक्षा या नव्या समाजाच्या ३ वैशिष्ट्यांचे पंतप्रधानांनी वर्णन केले. आणि ते साध्य करण्यासाठी पाच प्राण (शपथ) सांगितले. त्यापैकी चार लोकांसाठी होते, तर एक सरकारची भूमिका होती.

नागरिकांचे कर्तव्य व भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेची शपथ यापैकी प्रमुख होते. आधीच्या सरकारांनी किंवा आताच्या पंतप्रधानांनी हे आधी सांगितले नव्हते असे नाही, मात्र भ्रष्टाचाराविरुद्ध सामूहिक चेतना वापरण्याचे आवाहन आजच्या भाषणात करण्यात आले. समाजात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने सहसा राजकारणी असे आवाहन करत नाहीत, पण पंतप्रधानांनी काका-पुतण्याशाही व भ्रष्टाचाराबरोबर लोकचेतनेला जोडून या रोगाविरुद्ध जनआंदोलनाचे परिमाण देण्याचे सांगितले. भ्रष्टाचारावर हल्ला करण्याच्या नावाखाली सरकारची कारवाई राजकीय वैमनस्यातूनच होऊ नये आणि ती केवळ राजकीय वर्गाविरुद्धच नव्हे, तर शिपायापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्याच विरोधात व्हावी, तेव्हाच त्याचे यश शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...