आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Color Tantra Story | Why The Hare Lost And How The Tortoise Won The Race ...

रंगतंत्र कथा:ससा का हरला आणि कासव शर्यत कशी जिंकला ...

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुन्हा कासव आणि सशात वाद झाला व कासवाने शर्यतीचे आव्हान दिलेे. मग दोघांत स्पर्धा झाली. पुन्हा ससा झोप काढून पुढे गेला. कासव हसले. त्याने पळता पळता मोबाइल काढला अन् सशाला फोन केला. सशाने विचारले, आता काय झाले ? कासव म्हणाले, माझा काका या विभागाचा पालिका अधिकारी आहे, एवढेच सांगायचे होते. तू जिंकला तर उद्या तुझ्या दुकानावर आणि कारखान्यांवर बुलडोझर फिरवले जाऊ शकते. विचार कर.. इज्जत प्यारी आहे की विजय ?’ सशाने हे ऐकताच तो बेचैन झाला. रक्तदाब वाढला. तो घाबरून एका जागी बसला आणि तेथेच बेशुद्ध झाला. तासाभरानंतर कासव तेथून पुढे हसत हसत निघून गेले. अशा प्रकारे कासवाचाच पुन्हा विजय झाला.

या कथेतून धडा असा मिळतो की सशाने जर कासवाशी शर्यत लावली असेल तर धावताना कोणताही मोबाइल कॉल घ्यायचा नाही. {अतुल कनक

बातम्या आणखी आहेत...