आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Column By Akshay Kumar; Film Actor Says That Progress Cannot Be External Only And We Will Move Towards An India Where The Doors Of Opportunity Are Open To All Latest News And Updates

अक्षय कुमारचा कॉलम:अशा भारताकडे अग्रेसर होऊया, जेथे संधींची दारे सर्वांसाठी खुली असतील

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला वाटते की, विकास आपल्या संस्कारांशीही निगडित अाहे. मुलींनी देशांची मान उंचावली, हे आपण ऑलिम्पिकमध्ये पाहिले. मात्र देशातील काही भागांत आजही महिलांना बराेबरीचे अधिकार मिळत नाहीत, हेही वास्तव आहे.

देश आज ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या प्रवासात आपण खूप काही पाहिले. खूप काही मिळवले....मात्र, आजही बरेच काही गाठणे बाकी आहे. आज आपण चंद्रच काय, मंगळापर्यंतही पोहोचलो आहोत. सुई ते रॉकेटही तयार करत आहोत. मात्र प्रगती इतकीच नव्हे. ती केवळ वरवरची असू शकत नाही. विकासाचा हा क्रम...आतूनही असला पाहिजे. ज्या समस्यांशी आपण रोज झगडतो, त्यांच्याशीही संबंधित असला पाहिजे. स्वच्छता हाही एक असाच विषय आहे. चांगली बाब म्हणजे, देशाने स्वच्छता ही एक संस्कृती म्हणून स्वीकारणे सुरू केले आहे. आपल्याला आधुनिक भारतापासून स्वच्छ भारत व सुदृढ भारतापर्यंतची मजल गाठायची आहे. पंतप्रधानांनीही या विषयावर खूप भर दिला आहे. स्वच्छतेला संस्कृती बनवण्यासाठी आपण आपल्या महापुरुषांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. महात्मा गांधीजी म्हणायचे, स्वच्छतेतूनच स्वच्छ देश घडतो. आपण अशा भारताकडे अग्रेसर होऊ, जेथे भेदभाव नसेल. सर्व भारतीयांसाठी एकसमान संधी असतील. ऑलिम्पिकमध्ये मुलींनी देशाचे नाव उंचावले, हे आपण पाहिलेच आहे. मात्र आजही देशातील अनेक भागांत मुलींना बरोबरीचा हक्क मिळत नाही. हुंड्याचीही गंभीर समस्या आहे. ती रात्रीतून दूर होणार नाही. मात्र आपल्याला गांभीर्याने प्रारंभ करण्याची गरज आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा...

बातम्या आणखी आहेत...