आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सैनिक संख्याबळाऐवजी शस्त्रांवर वाढतोय विश्वास

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथ सैनिक भरती योजनेबाबत देशभरातील तरुणांमध्ये एक उकळी आली आहे. हे खरे आहे की, संपूर्ण जगातील सक्षम देश त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात युद्धात लष्करी ताकदीपेक्षा विनाशकारी शस्त्रांची जास्त गरज असल्याने प्रत्येक देश सैनिकांची संख्या कमी करून शस्त्रास्त्रांवर खर्च करत आहे. भारतात अंदाजे ६५% बजेट पगार, निवृत्तिवेतन व सैन्याच्या आस्थापनेवर जातो आणि पेन्शनवरील खर्च एकूण पगाराच्या बरोबरीचा आहे आणि दरवर्षी वाढत आहे.

महसुली खर्चाच्या तुलनेत भारतात उपकरणांवरील खर्च जगात सर्वात कमी आहे. चीनने १९८० पासून सैनिकांची संख्या ४५ लाख वरून कमी करण्यास सुरुवात केली आणि आज केवळ २० लाख सैनिक आहेत. त्याऐवजी शस्त्रांवर होणारा खर्च वाढला. भारतात केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील पेन्शनची पद्धत वाजपेयी सरकारच्या काळात रद्द करण्यात आली. आज अशा खर्चाच्या जागी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा योजना आणण्याची गरज आहे, जेणेकरून केवळ सरकार किंवा सैनिकांचेच नाही, तर सर्वसामान्यांचेही भविष्य सुरक्षित होईल. परंतु, अग्निपथ योजनेचा सर्वात मोठा दोष म्हणजे भविष्यात नोकऱ्या देण्याची हमी नाही. पैशाच्या कमतरतेच्या नावाखाली लष्करी सेवेच्या अटी कमी करता येत असतील, तर प्रत्येक वेळी निवडून आल्यावर खासदार/आमदारांना वेगळी पेन्शन का?

बातम्या आणखी आहेत...