आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:काँग्रेसला नव्या प्रतिभेचा आदर करावा लागेल

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वात नवा चेहरा उदयास येईल तेव्हाच काँग्रेसचे पुनरुज्जीवन तेव्हाच शक्य आहे, असे आज अनेक राजकीय विश्लेषकांना वाटते. नेहरू-गांधी घराण्याचा वारसा अतुलनीय असेल, पण आज लोक त्यांच्या नावाने मतदान करत नाहीत, निदान राष्ट्रीय पातळीवर तरी नाही. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रँड ८ वर्षांची सत्तेनंतरही आज मजबूत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. यापैकी किती राज्यांत नेहरू-गांधी घराण्याच्या नावावर मते पडली हे निश्चित नसले तरी काही राज्यांमध्ये काँग्रेस अजूनही इकडे-तिकडे निवडणुका जिंकते. पाच वर्षांपूर्वीपर्यंत अनेक विश्लेषकांचे मत होते की नेहरू-गांधी घराण्याशिवाय काँग्रेस फुटेल, पण आज त्यांचे मत बदलले आहे.

मात्र, काही नवे चेहरे घेऊनही काही साध्य होणार नाही. आज काँग्रेसला केवळ चेहराच नव्हे, तर स्वभावही बदलण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने ज्या गोष्टीला फार पूर्वी महत्त्व देणे बंद केले आहे, त्याला आज महत्त्व देण्याची गरज आहे आणि ती म्हणजे उत्कृष्टता. जीवनात असो, कंपनीत असो किंवा राजकीय पक्षात असो, यशाचा एकच मंत्र असतो आणि तो म्हणजे उत्कृष्टतेचा पाठलाग करणे. आज भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्कृष्टतेला महत्त्व द्यायला शिकले आहेत. ते त्यांच्या आजूबाजूलाही उत्कृष्टता पाहू इच्छितात, मग ते परिधान केलेल्या ब्रँडमध्ये असोत किंवा त्यांनी ज्या नेत्यांना मत दिले त्यामध्ये असो. आज भारतीय डिलिव्हरी बॉइजपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वांना रेटिंग देतात (ते त्यांना पाच स्टार देत असतील, अशी आशा आहे). विमानात चढताना आपण उत्कृष्टतेची अपेक्षा करतो. आपली रेल्वेस्थानके स्वच्छ असावीत आणि लसीकरण केंद्रांनी जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावू नये, अशी आपली इच्छा असते. आपल्याला फास्ट डेटा स्पीड हवी आहे. आपण पुस्तक किंवा तिकीट मिळवण्यासाठी थांबू इच्छित नाही. ऑनलाइन ऑर्डर केलेले अन्न आपल्यापर्यंत पोहोचल्यावर ते गरम असावे, अशी आपली इच्छा आहे. चित्रपटांनी आपले मनोरंजन करावे, अशी आपली इच्छा आहे. त्याने तसे केले नाही तर आपण दुसऱ्या चित्रपटाकडे किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊ. आपल्याला नवीन विमानतळ, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो ट्रेनची हवे आहेत.

आज भारतात सर्व काही व्यवस्थित चालले आहे का? नक्कीच नाही. आजही भारतातील सामान्य जीवन निराशाजनक आहे आणि आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण, फरक हा आहे की आता आपल्याला पूर्वीपेक्षा सर्वकाही चांगले हवे आहे. आता भारतीयांना उत्कृष्टतेचा अर्थ समजला आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना तो हवा असतो. आणि २०२२ च्या या भारतात काँग्रेस नावाचा पक्ष आहे, त्याला उत्कृष्टतेपेक्षा आडनावाचा जास्त आदर आहे. त्या आडनावापुढे कोण किती नतमस्तक होईल, याशिवाय आज काँग्रेसमध्ये दुसरे काहीही महत्त्वाचे नाही, याचे आश्चर्य वाटते. आजच्या भारतात उत्कृष्टताविरोधी असणे ही हरण्याची उत्तम रणनीती आहे आणि हे अनेक राज्यांच्या निवडणुकांतील काँग्रेसची कामगिरी पाहून सिद्ध होते. म्हणूनच सर्वात वर कितीही चेहरे बदलले तरी काँग्रेस जोपर्यंत उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याचे मूळ मूल्य स्वीकारत नाही तोपर्यंत ती भारतीयांना आकर्षित करू शकणार नाही. आज काँग्रेस फुटली असे आपण म्हणतो, म्हणजे काय? याचा अर्थ काँग्रेसच्या समजुतींना तडा गेला आहे. पक्षात उत्कृष्टतेला महत्त्व दिले जात नाही, प्रतिभा वाया जात राहते. भारतीय जनतेला हे नको आहे. टॅलेंटला वाव मिळतोय, हे त्यांना बघायचे आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसलेले लोक समोर यावेत आणि यशस्वी व्हाते, हे त्यांना पाहायचे आहे. कारण अनेक भारतीय असेच असतात. त्याच वेळी काँग्रेसमध्ये हक्क, विशेषाधिकार आणि भाटगिरीला महत्त्व दिले जाते. परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. गेल्या एका वर्षात भारतात दोन डझन युनिकॉर्न कंपन्या उदयास आल्या आहेत. १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्य झालेल्या कंपन्यांना युनिकॉर्न म्हणतात. या कंपन्या सामान्य भारतीयांनी उभारल्या होत्या, त्यापैकी अनेक हुशार तरुण आहेत, त्यांनी उत्कृष्टतेचा पाठपुरावा केला आणि कधीही हार मानली नाही. अशा भारतात प्रतिभेचा तिरस्कार आणि चमचेगिरीला बक्षीस देणाऱ्या संघटनेचे महत्त्व काय उरते? वास्तवात काँग्रेस अत्यंत आवश्यक राजकीय विचारसरणीचे प्रतिनिधित्व करते. ती लोकशाहीत नितांत आवश्यकता असलेल्या विरोधी पक्षाची भूमिकाही बजावते. हे दोन्ही नैतिक युक्तिवाद काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी पुरेसे आहेत. पण, आजच्या भारतातील उत्कृष्टतेचा तिरस्कार करणाऱ्या संस्थेला आपण नैतिकदृष्ट्या कसा न्याय देऊ शकतो? आपल्या प्रतिभेला प्रोत्साहन न देणाऱ्या कोणत्याही संस्थेला भारतीयांनी का पाठिंबा द्यावा?

दुसऱ्या बाजूला भाजप आहे, त्यांच्याकडे प्रतिभावंतांना पुढे जाण्याचा मार्ग खुला आहे. उत्कृष्टतेचा पुरस्कार करण्याच्या बाबतीत भाजप परिपूर्ण आहे का? अजिबात नाही. तिथेही घराणेशाहीचे राजकारण आहे. तिथेही काही प्रमाणात खुशामत करण्याची संस्कृती आहे. तिथे प्रत्येक प्रतिभावंताला पुरस्कार मिळतो किंवा ज्याला पुरस्कार मिळतो तो प्रतिभावंतच असतो, असे नाही. तेथे अद्याप परिपूर्ण गुणवत्ताशाही नाही, पण किमान तो इतरांपेक्षा चांगली कामगिरी तरी करत आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com