आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Congress Won Himachal Even Without Rahul's Activism | Article By Abhijit Ayyar Mitra

गुजरात-हिमाचल निवडणूक विशेष:राहुल यांच्या सक्रियतेशिवायही काँग्रेसने जिंकला हिमाचल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये भाजप आणि हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली, तर दिल्लीत पराभूत होऊनही भाजपची कामगिरी चांगली होती. मग या निवडणुकीच्या निकालांमधून आपण काय सारांश काढू शकतो? सर्वप्रथम गुजरातबद्दल बोलू. तिथल्या आम आदमी पक्षाच्या कामगिरीचा विचार न करता पुढच्या निवडणुकीत तो सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल, असे मानूया. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर लक्षात येईल की, ‘आप’ने एखाद्या भागात जम बसवला की, तो तिथं वेगाने पुढे सरकतो. सहसा तो काँग्रेसची मते खाऊन असे करतो. ‘आप’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो भाजपविरोधातील असंतोषाचा आवाज चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्याचा फायदा घेतो. दुसरीकडे गुजरातमध्ये भरघोस विजय मिळवूनही ‘आप’ हा भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. या वेळी भाजपच्या विजयामागे दोन प्रमुख कारणे होती. एक, पाटीदारांचा मोठा पाठिंबा. हार्दिक पटेलला पक्षात सामील करताना भाजप इंदिरा गांधींचे तत्त्व पाळत होता की, सर्वांना एकाच वेळी आपल्या विरोधात करू नका. दुसरे कारण म्हणजे ‘आप’ने भाजपविरोधी मते फोडणे. याचा अर्थ भाजपचा मोठा विजय बाहेरच्या शक्तीच्या मदतीने झाला आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे तर त्याने गुजरातमध्ये स्वतःला अप्रासंगिक समजले पाहिजे. राहुल गांधींनीही त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान गुजरातला जाणे आवश्यक मानले नाही. त्यांनी असे का केले हे एक गूढच आहे, कारण गुजरातमध्ये त्यांची सर्वाधिक गरज होती. भाजपच्या पाव शतकांच्या कारकीर्दीनंतर मतदारांमध्ये असंतोष असेल, तर त्याचे भांडवल करण्याची हीच योग्य वेळ होती. यानंतर राहुल गांधींबद्दल काय बोलावे? एक तर ते ग्राउंड रिअॅलिटीपासून पूर्णपणे दूर गेलेले आहेत किंवा ते इतके व्यावहारिक आहेत की, त्यांनी आधी गुजरातमधील नामुष्कीपासून स्वतःला दूर ठेवले. मात्र, हिमाचलमध्ये तर काँग्रेसने बाजी मारली आहे. भारत जोडो यात्रेचा भाग नसलेले हे आणखी एक राज्य आहे. राहुल गांधींनी हिमाचलमध्ये निवडणूक प्रचारही केला नाही. तिथे काँग्रेसचा विजय झाला त्याचे कारण भाजपमधील अंतर्विरोध आहे. काँग्रेस आणि गांधी घराणे यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरावी की, निवडणुकीच्या राजकारणात ते इतके अप्रस्तुत झाले आहेत की, काँग्रेसचा विजय किंवा पराभव त्यांच्यावर आता अवलंबून नाही. यानंतर पुढे काय, असा प्रश्न पडतो. गुजरातमधील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितले की, आता गुजरातमधील काँग्रेस नेते हळूहळू भाजप आणि आम आदमी पक्षात जातील. असे झाले तर गुजरातमध्ये यानंतर काँग्रेसला सावरता येणार नाही. गुजरातमधील विजयाचे श्रेय भाजप मोदी मॉडेलच्या सुशासनाला देईल आणि हिमाचलमधील पराभवासाठी अंतर्गत विश्वासघाताला जबाबदार धरेल. दुसरीकडे काँग्रेस भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेचा पुरावा म्हणून हिमाचलला सादर करण्याचा प्रयत्न करेल आणि गुजरातमधील दुफळीबद्दल रडगाणे गाईल. हिमाचलमध्ये यानंतर भाजप काही करेल का? शक्यता कमी आहेत. भाजपच्या सवयीप्रमाणे ते योग्य संधीची वाट पाहतील आणि त्यादरम्यान काँग्रेसमधील बंडखोर सुरांना प्रोत्साहन देत राहतील. आणि यातून राहुल काही शिकणार का? त्यांची शैली बघता फार अपेक्षा नाहीत. मोदी आणि राहुल यांच्याप्रमाणेच अरविंद केजरीवाल हेसुद्धा ‘आप’चे एकमेव सर्वेसर्वा आहेत. लोकांना आपल्या विरोधात जाऊ देऊ नये, हा धडा ते चांगलाच शिकले आहेत. ते एकेकाळी ध्रुवीकरण करणारे नेते होते, परंतु एनआरसी-सीएए आणि कलम ३७० सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपला विरोध न करून त्यांनी दाखवून दिले की, ते बदलले आहेत. ते उमेदवारांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करतात आणि त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतात. त्यांचे सूक्ष्म व्यवस्थापन उत्तम आहे. भारतीय लोकशाहीचे भवितव्य मजबूत आणि एकजूट विरोधी पक्षावर अवलंबून आहे. पण, निदान राहुल गांधी तरी तसे करण्यास सक्षम वाटत नाहीत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अभिजित अय्यर मित्रा सीनियर फेलो, आयपीसीएस abhijit@ipcs.org

बातम्या आणखी आहेत...