आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Cultivation Of Crops Is Beneficial According To Global Conditions| Agralekh Of Daily Divya Marathi

अग्रलेख:जागतिक परिस्थितीनुसार पिकांची लागवड फायदेशीर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरणीपूर्वीच पुढील हंगामातील पिकांचा एमएसपी वाढवणे हे केंद्राचे चांगले पाऊल आहे. त्यामुळे किमान या भावात सरकार पीक खरेदी करेल, असा विश्वास शेतकऱ्याला मिळेल. हे खरे आहे की, जेथे पूर्वी एकूण उत्पादनाचा एक छोटासा भाग एमएसपीवर विकला जात असे, तेथे आज सरकार विविध गरीब कल्याणकारी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी करत आहे. जगात अजूनही उत्पादनात घट होण्याचा धोका आहे, म्हणजे भारताचा तांदूळही चांगल्या दराने विकला जाईल.

धान आणि मुख्य पिकांऐवजी तेलबिया व कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे, कारण या वेळीही तेल व डाळींचे भाव गगनाला भिडले आणि भारताला महागडी आयात करावी लागली. यामुळेच धानाचा एमएसपी केवळ ५.१५% वाढला आहे, तर सोयाबीन आणि ज्वारीचा एमएसपी ८.८६ आणि ८.४६% झाला आहे. गेल्या वर्षी बहुतांश कडधान्य पिकांची १-२% वाढ झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती, परंतु या वेळी सरकारने डाळी आणि तेलबियांमध्ये सरासरी ५-६% वाढ केली आहे. सरकार अजूनही आपल्या खरेदी केंद्रांवर त्यांची फारशी खरेदी करत नाही, ही वेगळी बाब आहे. त्यामुळे हुशार व्यापारी वर्गाला किंमत कमी ठेवण्याची संधी मिळते. हे सर्व मुद्देदेखील विचारात घेतले पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...