आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेटिंग अॅप्सच्या वापरामुळे आयुष्याचा जोडीदार शोधणे आता फार सोपे झाले आहे. देशात डेटिंग साइट्स आणि डेटिंग अॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलीय. मात्र या लोकप्रियतेबरोबरच या अॅप्सच्या माध्यमातून स्वत:ची खरी ओळख लपवून फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहेत. सोशल मीडियावर बरेच जण स्वत:ची ओळख लपवून बनावट आयडीद्वारे या अॅप्सचा वापर करतात. परिणामी अशा फसवणुकीमधून दाखल झालेले गुन्हे आणि त्यामधल्या पीडितांना न्याय मिळवून देताना अडचणी येतात. म्हणूनच अशा डेटिंग अॅपचा वापर करताना अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
डेटिंग अॅप्सचा वापर करताना सावध राहा समाज माध्यमांवरील डेटिंग अॅपवर अधिक वेळ घालवत असाल तर सावध राहा. डेटिंग अॅप्सचा वापर करून ‘सेक्सटोर्शन’ हा आणखी फसवणुकीचा नवीनच प्रकार समोर येतो आहे. समाजातील उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि इतर उच्चपदस्थांनादेखील या सेक्सटॉर्शन प्रकाराचा सामना करावा लागतो आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय? ●डेटिंग अॅप्सवर अथवा फेसबुकवर अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्या महिलेचा प्रोफाइल फोटो अत्यंत मोहक असतो. अशा फ्रेंड रिक्वेस्ट बहुतांश करून पुरुषांना येतात. प्रोफाइल फोटो मोहक असल्यामुळे पुरुषांना ती रिक्वेस्ट स्वीकारण्याची इच्छा होते. त्यानंतर संबंधित प्रोफाइलवरील महिला फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेल्या पुरुषांशी ओळख वाढवते. त्याचा व्हॉट्सअॅप क्रमांक घेते. ओळख वाढवून अश्लील चॅट करते. नंतर ती तिचा स्वतःचा न्यूड व्हिडिओ व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर दाखवते. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेल्या पुरुषालादेखील त्या व्हिडिओ कॉलवर न्यूड होण्यास सांगितले जाते. हा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल चालू असताना समोरची व्यक्ती अश्लील चाळे करते किंवा करण्यास भाग पाडते आणि कॉल चालू असताना आणि स्क्रीन रेकॉर्डिंग केले जाते. ●व्हिडिओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ती संबंधित पुरुषाला पाठवली जाते. ते रेकॉर्डिंग फेसबुक, यूट्यूबला अपलोड करण्याची, ते रेकॉर्डिंग तुमच्या नातेवाइकांना, मित्रांना सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. पुरुषाकडे पैशांची मागणी केली जाते. ‘सेक्सटॉर्शन’मुळे आत्महत्या झाल्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात पैशाची मागणी केल्यानंतर पैसे न दिल्यामुळे नग्न व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, ट्विटर, यूट्यूब येथे अपलोड करण्याची धमकी दिल्याने पुण्याच्या काही तरुणांनी जीवन संपवल्याची घटना घडलेल्या आहेत. अश्लील फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साइटवर प्रसारित करण्याची भीती दाखवून खंडणीची धमकी देण्याचे प्रकार वाढल्याने अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपासून सावध राहणे हाच यापासून स्वत:चा बचाव करण्याचा योग्य मार्ग आहे. कुठली काळजी घ्यावी? - कुणाशीही अश्लील चॅट करू नका. - खासगी फोटो किंवा व्हिडिओ कोणालाही शेअर करू नका. - न्यूड व्हिडिओ कॉल करू नका. इतरांचा स्वीकारू नका. न घाबरता सायबर पोलिस स्टेशनला माहिती द्या.
योगेश हांडगे संपर्क : handgeyogesh@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.