आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - अर्पिता मुखर्जी, मॉडेल, अभिनेत्री:सरकारी नोकरी नाकारली, कागदपत्रांत केवळ आईच्याच नावाचा उल्लेख

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : १० जून १९८६, बेलघोरिया, बंगाल शिक्षण : स्कॉटिश चर्च कॉलेज, कोलकाता येथून ग्रॅज्युएशन कुटुंब : मिनाती मुखर्जी (आई) मालमत्ता : सुमारे २० कोटी रु. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट््सनुसार

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या छाप्यांमुळे अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जी प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. ईडीने आतापर्यंत त्यांच्याकडून ५० कोटींहून अधिक रोख रक्कम आणि अमाप संपत्तीची माहिती गोळा केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये तृणमूल सरकारचे माजी शिक्षण व उद्योग मंत्री पार्थ चटर्जी आणि अर्पिता यांची नावे समोर आली आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी अर्पिताने वयाच्या १६व्या वर्षी करिअर करण्यासाठी मॉडेलिंगला सुरुवात केली. सरकारी कर्मचारी असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या जागी नोकरीची ऑफरही देण्यात आली होती, मात्र अर्पिता यांनी ती धुडकावून लावली. अर्पिता यांना काही काळ संघर्ष करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. २००८ मध्ये त्यांना बंगाली चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अर्पिता यांनी कोणत्याही कागदपत्रात वडील आणि पतीचा उल्लेख केलेला नाही. त्या आईचे नावच वापरतात. अर्पिता नेल आर्टिस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील आहेत.

ईडीने यांच्या दोन फ्लॅटवर छापे टाकून ५० कोटी रुपये रोख आणि तीन किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

वाद व इतर तथ्ये : आईला दुर्दशेत जगणे भाग पडले -अर्पिता यांनी त्यांच्या आईला पडक्या घरात एकटी सोडल्याचा आरोप आहे. -त्यांच्या नावावर एलआयसीच्या ३१ पॉलिसी सापडल्या, त्यामध्ये नॉमिनी पार्थ चटर्जी आहेत. - अर्पिता शूटिंगसाठी टॅक्सीने जात असत. दुसऱ्या चित्रपटानंतर त्यांनी जुनी मारुती ८०० कार खरेदी केली.

प्रारंभिक जीवन : मध्यमवर्गीय कुटुंबात झाले संगोपन अर्पिता मुखर्जींचे वडील सरकारी कर्मचारी होते. आई गृहिणी आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोलकात्यातील रामकृष्ण शारदा मिशन सिस्टर निवेदिता गर्ल्स स्कूलमध्ये झाले. आई मिनाती मुखर्जींच्या म्हणण्यानुसार, अर्पिता अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी कोलकाता येथील प्रतिष्ठित स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. येथून त्यांनी पदवी मिळवली. त्यांना एक बहीणही आहे, तिचे लग्न झाले आहे.

करिअर : प. बंगालच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले अर्पिता यांनी २००४ मध्ये मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात केली. काही काळ संघर्ष केल्यानंतर २००८ मध्ये प्रसिद्ध बंगाली अभिनेता जीतसोबत ‘पार्टनर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. २०१० मध्ये अर्पिता यांनी ‘मामा भगवान’ बंगाली चित्रपटात बंगाली अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी आणि रणजित मलिक यांच्यासोबत काम केले. २०११ मध्ये त्यांचा ‘बांगला बचाओ’ चित्रपट आला होता, त्यात पाओली दामसारख्या अभिनेत्रीही होत्या. बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त अर्पिता यांनी ६ ओडिया आणि काही तामिळ चित्रपटांमध्येही काम केले. ओडिया चित्रपटांमध्ये त्यांनी ‘वंदे उत्कल जननी’, ‘प्रेम रोगी’, ‘केमिटी आ बंधन’, ‘मु काना एते खराप’ आणि ‘राजू आवारा’ असे चित्रपट केले. अर्पिता पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध नाकतल्ला उद्यन संघाच्या दुर्गापूजेच्या ब्रँड अॅम्बेसेडरही होत्या.

बातम्या आणखी आहेत...