आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Design Thinking Can Change The Way Of Looking At Problems, Solutions | Marathi News

पर्यायांनी समृद्ध:डिझाइन थिंकिंगमुळे बदलू शकते समस्या, उपायांकडे पाहण्याची दृष्टी

शिक्षण8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकणे आयुष्यभर सुरू असते. शिकण्याच्या मोठ्या भागामध्ये सभोवतालचे निरीक्षण करणे, समजून घेणे आणि आत्मसात करणे समाविष्ट आहे. विद्यमान समस्यांचे निराकरण करण्यात डिझाइनदेखील महत्त्वाची भूमिका बजावते, कारण कोणतीही गोष्टीची निर्मिती करण्याचा डीएनए खरे तर डिझाइनच असतो. तो आपल्याला त्याच समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची, त्यावर उपाय शोधण्याची साधने देतो. गुंतागुंतीच्या समस्या छोटे छोटे भाग करून समजून घेणे हा डिझाइन थिंकिंगचा भाग आहे. डिझाइन शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तवाशी जोडते आणि त्यांना उपायांवर काम करण्यासाठी ज्ञान व अनुभव देते. आजही बहुतांश लोक डिझाइनला केवळ सौंदर्य शिल्प मानतात, पण डिझाइन थिंकिंग हे एक सामाजिक तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये व्यावहारिक साधनांसह मानवी वर्तन समजून घेणे आवश्यक आहे.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आज आपण पर्यायांनी समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपैकी एक आहोत. नवनवीन कल्पना आणि नवोन्मेष उद्योजकतेकडे नेण्याचे मार्ग खुले केले जात आहेत. आपण माहीत असलेल्या गोष्टींवरही विचारतो तेव्हाच आव्हाने व अडचणींवर सर्जनशील उपाय शक्य आहेत. ज्या मनांत नवनवीन कल्पनांची बीजे पेरली जातात ती जोखीम घेणारी व पराभवातून शिकून पुढे जाणारी असतात. उदा. एनआयडीचे बाळा महाजन व एन. पंडित यांनी ग्रामीण भागातील साधनसंपत्तीसाठी टिकाऊ उपाय म्हणून गांडूळ बायो डायजेस्टर सिस्टिमसह टायगर टॉयलेटची रचना केली.

आता खेळांचेच बघा. खेळण्यांपासून गेमिंग उद्योग किती वेगाने बदलत आहे? खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून शिक्षण, डिझाइन ते थिंकिंग, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि हस्तकला यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्थान निर्माण करत आहेत. डिजिटल ते बोर्ड गेम्स, खेळणी, खेळण्याची जागा, क्रीडा उपकरणे, अॅक्टिव्हिटी किट्स आणि खेळातील परस्परसंवादी अनुभव अशा डिझाइनद्वारे अनेक नवकल्पना शक्य झाल्या. आजच्या आधी आपण गंभीर काळजी वैद्यकीय उपकरणांमध्ये डिझाइनच्या सामर्थ्याची कल्पना करू शकत होतो? कदाचित नाही, कारण हे क्षेत्र आयातीवर अवलंबून आहे. पण, ईसीजी मशिनपासून ते फिजिओथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिन्सपर्यंत डिझाइन आणि नावीन्य खूप महत्त्वाचे आहे, हे वास्तव आहे. डिझाइन थिंकर सतीश गोखले यांनी जगातील पहिली पूर्णपणे मोटरवर चालणारी मोबाइल कॅथ लॅब आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी ६० डोस ड्राय पावडर इनहेलर तयार केले. नितीन सिसोदिया यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रचलित असलेल्या नावीन्यपूर्ण एबीआर तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेण्यासाठी सोहम उपकरणाची रचना केली. आमचीच एक विद्यार्थिनी शेफाली बोहरा हिने वर्गमित्रासह कोणतीही स्त्री स्तनाचा कर्करोग सहज शोधू शकेल असे वैद्यकीय उपकरण (डॉटप्लॉट) डिझाइन केले आहे.

कंपन्या त्यांच्या गतीने धावू शकतील अशा तरुण टॅलेंटच्या शोधात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे, उद्योगाच्या गरजेनुसार स्वत:चे कौशल्य वाढवणे महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक संस्थांनी ठरवून दिलेल्या इंटर्नशिप करू नका. शक्य तितक्या इंटर्नशिप करा. गोष्टी प्रत्यक्षात कशा कार्य करतात ते स्वतः पाहा. शक्य असल्यास स्वतःच्या कल्पनेच्या आधारे उद्योजक बनण्याचा प्रयत्न करा.

प्रवीण नाहर संचालक, एनआयडी,अहमदाबाद ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

बातम्या आणखी आहेत...