आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर तुम्ही वेगळा विचार करत असाल तर जीवनात कुठेही फसणार नाही. तेथे तुम्ही स्वत:साठी संधी निर्माण कराल. ही पुढे जाण्याची संधी ईश्वराने तुम्हाला दिली आहे. अपयश आणखी चांगले करण्याची संधी असते. वेगळा विचार कराल तर संबंध कधी बिघडणार नाहीत. चढ-उतारांकडे संधी म्हणून बघत नात्यांमध्ये अधिक प्रामाणिकपणा, समर्पण आणि जबाबदारी दाखवत ते मजबूत करू शकता. हाच वेगळा विचार करणे होय. ईश्वर आणि गुरू कृपेने प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असते. कोणतीही परिस्थिती असली तरी तुम्ही लाभ घेऊ शकता. कोणत्याही स्थितीत समाजात योगदान देऊ शकता.
जे व्हा तुम्ही जीवनात वेगळा विचार करता, तेव्हाच चमत्कार करू शकता. विचाराची शक्ती अशी आहे की, तुमचे संबंध दरवळतील. विचार मनुष्याला देव बनवते. किती खोलीवर जायचेय, चांगला विचार करायचा, वाईट विचार करायचा.. या सर्व आपल्या मनातील गोष्टी आहेत. आपल्या महान धर्मग्रंथांनी अनेक प्रकारचे विचार शिकवले आहेत. आधुनिक शिक्षणानेही जीवनाच्या उत्कर्षासाठी अनेक प्रकारचे विचार शिकवले. परंतु ती नकारात्मकता त्यागून आणि सकारात्मकता ग्रहण करूनच आपण विचारांच्या परिपक्वतेपार्यंत पोहोचू शकतो. जर आम्ही आपला दोन हजार वर्षे जुना इतिहास वाचला तर कळेल की मानवी इतिहास विचारांचा इतिहास आहे. कोणताही विचार आला, त्यावर पुनर्विचार केला, पुन्हा त्यातून एखादे नवी बीज किंवा उत्पादन येते. यातून एक यंत्रणा बनली, मग संस्कृती निर्माण झाली आणि लाखो लोक लाभान्वित झाले. ही विचारांची ताकद आहे. सामान्य विचार आणि वेगळा विचार यात फरक आहे. नियमित विचार काय आहे? जेव्हा आपण विचार करतो की, अभ्यास करून नोकरी मिळेल किंवा व्यवसाय करू, कुटुंबाची काळजी घेऊ आणि आनंदी राहू. मात्र वेगळा विचार करणारा व्यक्ती म्हणतो, चांगला अभ्यास करेन, नोकरी किंवा बिझनेसही चांगला करेन. समाजाला काही देईल, देशाची समृद्धी वाढवेन आणि मानवतेसाठी काम करेन. एकूणच वेगळा विचार करणारा व्यक्ती व्यक्ती जगातून जाण्यापूर्वी आणखी काही चांगले करण्याचा प्रयत्न करेन, असा विचार करतो. दक्षिण अाफ्रिकेत गांधींजींना रेल्वेतून उतरवले होते. हा प्रसंग सर्वांना माहीत आहे. परंतु तेथे त्यांनी िवचार केला की, रंगभेदाचे धोरण संपवायचे आहे. ते तेथून विचार घेऊन आले आणि नंतर इंग्रजांना झुकवले. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, समाजसेवक, सर्वच व्यावसायिकांसाठी ‘थिंक डिफरेंट’ असे आहे की, ‘मी प्रयत्न करेन, यश मिळाले नाही तर चौथ्यांदा प्रयत्न करेन. अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहोचलो नाही तर पाचव्यांदा प्रयत्न करेन. जोपर्यंत जीवनात निश्चित ध्येयापर्यंत पोहोचत नाही, आराम करणार नाही.’ हा महापुरुषांच्या जीवनाचा सिद्धांत आहे. मी आतापर्यंत ५०० हून अधिक महापुरुषांची जीवनचरित्रे वाचली. या सर्वांच्या जीवनातील चांगल्या गोष्टींत एक समान बाब आहे ती म्हणजे ते थांबले नाही, झुकले नाहीत. श्रीलंकन खेळाडू मार्वन अटापट्टूच्या जीवनाचे रंजक उदाहरण आहे. ते आयुष्यातील पहिली कसोटी खेळत होते. पहिल्याच डावात शून्यावर बाद झाले. दुसऱ्या डावातही शून्यावर बाद. यानंतर त्यांना संघातून बाद करून स्वदेशी पाठवले गेले. घरच्यांनी दिलासा दिल्यानंतर ते २१ महिने स्थानिक क्रिकेट खेळत राहले. २१ महिन्यांनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची संधी मिळाली. त्या मालिकेतील पहिल्या डावात पुन्हा शून्यावर बाद. पुढल्या डावात १ धाव काढली. टीमने पुन्हा संघातून काढले. या वेळी घरच्यांनी पर्याय शोधण्यास सांगितला. हा त्यांचा समान्य विचार होता. पण अटापट्टूंनी सांगितले की, क्रिकेट त्यांचा छंद किंवा पर्याय नाही. ते जीवन आहे. हा वेगळा विचार आहे. ते घरगुती क्रिकेटमध्ये परतले. १९ महिने संघर्ष केला. पुन्हा टेस्टमध्ये आले. पण परिणाम तोच.. ०..०..१. आता अटापट्टू थोडे निराश झाले. श्रीलंकन मीडियाने लिहिणे सुरू केले की ते आंतरराष्ट्रीय व मोठ्या सामन्यांसाठी बनलेले नाहीत. ते टॉप क्लासच्या बॉलरचा सामना करू शकत नव्हते. अटापट्टू चार्टर्ड अकाउंटंट होते. कुटुंबीयांनी म्हटले की यातच करिअर कर. परंतु ते स्पष्ट होते की क्रिकेटलाच करिअर बनवायचे. तीन वर्षांनंतर त्यांना पुन्हा टेस्टचा कॉल मिळाला. यावेळी त्यांनी ५० धावा केल्या. नंतर विक्रमांचा पाऊस सुरू केला. ते श्रीलंकेसाठी आदर्श ठरले. महाराज म्हणतात, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी फायदा-नुकसानाबाबत शंभर वेळा विचार करा. पण त्यानंतर एकदाच काम सुरू करा. मग त्यात १०० अडथळे आले तरी थांबू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.