आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा- सूप कसे प्यावे? सुपाच्या बाऊलला एक घड्याळ समजा. बाऊलच्या मध्यभागी एक चमचा ठेवा. आता चमचा आपल्या दिशेने करण्याऐवजी विरुद्ध दिशेने ठेवा. सूप चमच्यात घ्या. नंतर चमचा त्याच दिशेने उचलून वर उचलून तुमच्या दिशेने आणा आणि सूप प्या.
- चटणीसोबत : कटलेट, फ्रेंच फ्राइज किंवा स्नॅक्स खाताना आपण अख्खा स्नॅक्स उचलतो आणि चटणीच्या भांड्यात बुडवून खातो. बऱ्याचदा तोच स्नॅक्सचा घास आपण पुन्हा पुन्हा त्या चटणीत बुडवून खातो, त्यामुळे चटण्या उष्ट्या होतात. योग्य पद्धत... तुमच्या ताटात एक चमच्या चटणी काढा आणि मग त्यात स्नॅक्स बुडवून खा.
- स्वच्छतेची काळजी : दुसऱ्या भांड्यातून अन्न स्वत:च्या ताट-वाटीत घेण्यासाठी तुम्ही ज्या चमच्याने खात आहात त्याचा वापर करू नका. सर्व्हिंग स्पून तेथे ठेवलेले असतात. त्यामुळे तो सर्व्हिंग स्पून किंवा नवीन चमचा वापरा. तुम्हाला चमचा चाटण्याची सवय असेल तर हॉटेलमध्ये असे करू नका. ते असभ्य समजले जाईल.
- चहा-कॉफी पिताना : आजूबाजूला बघत चहा, कॉफी, ज्यूस पिणे योग्य नाही. चहा, कॉफी किंवा कोणताही ज्यूस पिताना नजर फक्त ग्लास किंवा कपावर असावी.
- जेवण झाल्यावर उठताना : रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर उठताना खुर्ची मागे सरकवा, उठून खुर्चीच्या मागे जा आणि खुर्ची पुन्हा पुढे सरकवून व्यवस्थित ठेवा.
- टीम मधुरिमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.