आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूकता:मोबाइल वापरण्याची शिस्त लावून घ्या...

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहसा मोबाइल चार्जिंग स्विच बेडजवळ असतो. बेडजवळ असलेल्या स्विचजवळ मोबाइल चार्ज करणार नाही असे मनाला सांगा आणि असे करणे कठीण जात असल्यास बेडची व्यवस्था अशा ठिकाणी करा, जेथे स्विच नसेल. तुम्हाला ज्या अॅप्सची खरोखर गरज आहे अशाच अॅप्ससाठी नोटिफिकेशन ठेवा. विशेषतः सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद ठेवा. मोबाइलशिवाय जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. टीव्ही पाहताना, संध्याकाळी घराबाहेर फिरताना किंवा कुटुंबासोबत असताना मोबाइल पाहू नका. मेसेंजर अॅपवरील संदेशांना प्रत्युत्तर देण्यात वेळ पटकन जातो, विशेषत: चार किंवा पाच लोकांशी बोलत असताना, ग्रुप चॅट करत असताना. हे टाळण्यासाठी मेसेंजरमधील सर्व ग्रुप चॅट म्यूट करा. यामुळे दिवसभर मोबाइल वापरणे टाळता येईल. मोबाइल वापरण्याचं, सोशल मीडिया चेक करण्याचं एक निश्चित वेळापत्रक बनवून ठेवा. केवळ कंटाळा आला म्हणून मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्याची अनेकांना सवय असते. अशा वेळी हातात घेतलेल्या मोबाइलमुळे खूप टाइमपास होतो. मोबाइल विशिष्ट वेळेतच वापरण्याची स्वत:ला सवय लावून घ्या, जेणेकरून मोबाइल वापरण्याची शिस्त तुम्हाला स्वत:ला लागेल.

टीम मधुरिमा

बातम्या आणखी आहेत...