आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Discussion On Knowledge Sharing Is Necessary, Decision Should Be Made Soon | Article By Navneet Gurjar

वृत्तवेध:ज्ञानवापीवर चर्चा आवश्यक, निर्णय लवकर व्हायला हवा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानवापीबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय आला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली आहे. खरे तर मुस्लिम बाजूने म्हटले आहे की, विशेष प्रार्थनास्थळ कायदा १९९१ नुसार स्वातंत्र्यानंतर कोणतेही धार्मिक स्थळ आहे त्याच स्वरूपात राहील.

त्यामुळे ज्ञानवापी प्रकरण आता सुनावणीयोग्य नाही. या प्रकरणात विशेष पूजास्थळ कायदा लागू होणार नाही, कारण वाद तर आहे आणि तो सोडवलाही गेला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. एक बाजू म्हणत आहे, तर खरेही आहे! आत श्लोक लिहिलेले आहेत, याचाही पुरावा देत आहे. हत्तीचा आकार, शिवलिंगही आहे. बाहेर शिवलिंगासमोर एक मोठा नंदी बसलेला आहे. शृंगार-गौरीचे मंदिर आहे! त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याचे निराकरणही व्हायलाच हवे. पण निराकरण तत्काळ व्हावे. तो दीर्घ, खूप दीर्घकाळ चालू नये. कोणत्याही राजकीय पक्षाने दोन-तीन निवडणुकांत त्याचा फायदा घेऊ नये यासाठी निर्णय कोणत्या बाजूने असला तरी तो लवकर लागावा.

हे खरे आहे की, वेळोवेळी वेगवेगळे मुस्लिम आक्रमक आले आणि त्यांनी आपल्या मर्जीनुसार आपल्या भावनांना चिरडले. आपल्या आराध्य दैवतांना धक्का लावला. आपले पूज्य देवी-देवता ज्यामध्ये ते स्थापन झालेले होते, म्हणजे विविध देवस्थाने आणि धर्मग्रंथ नष्ट केले. याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत - अनेक पुस्तकांत, पत्रांत आणि शिलालेखांतही. आता असे ऐतिहासिक वाद, एक प्रकारचा घोर अन्याय कोणत्याही कायद्याच्या घोंगडीने झाकून तर ठेवता येणार नाही, त्यामुळे त्याचे निराकरण झालेच पाहिजे. पण, जे काही व्हायचे ते एकाच वेळी व्हायला हवे. लवकर व्हावे, कारण आपल्याला आपली श्रद्धा एखाद्या मतांच्या शोरूमवर ठेवू द्यायची नाही. आपल्याला आपल्या भावनांना व्होट मशीन बनण्यापासून रोखायचे आहे. किंबहुना अशा खटल्यांच्या निकालात दिरंगाई झाल्यामुळे काही तिसऱ्या बाजू वर्षानुवर्षे त्यांचा गैरफायदा घेत राहतात आणि फसवणूक होऊन आपल्याला हे सर्व पाहत राहावे लागते. हे सर्व आता होऊ नये.

विकास आणि अर्थव्यवस्था रुळांवर आणण्याच्या या युगात आपण भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ इच्छित नाही. …आणि आपण कमकुवत झालो तरी किमान आपण तिसऱ्या बाजूला त्याचा फायदा घेण्याच्या बाजूने तर बिलकुलच नाही. असायलाही नको. कारण या भावनांचा गैरफायदा घेऊन त्या आक्रमणकर्त्यानेही मंदिरे वा अन्य धार्मिक स्थळे फोडून दुसरी देवस्थाने बांधली असावीत! ज्ञानवापी प्रकरणाबाबत बोलायचे तर, १८ ऑगस्ट २०२१ रोजी पाच महिलांनी शृंगार-गौरीचे नियमित दर्शन-पूजा आणि देवतांच्या रक्षणासाठी याचिका दाखल केली तेव्हा ते प्रथमच न्यायालयात आले होते. त्यावर दिवाणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करून ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

१६ मे २०२२ रोजी सर्वेक्षणाच्या कार्यवाहीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवसापासून वाराणसी जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आता दोन्ही बाजू आलटून-पालटून पुरावे समोर ठेवत आहेत आणि न्यायालय त्यांची तपासणी करत आहे. याचा लवकरच निर्णय लागेल हे नक्की. हीच आशा आणि अपेक्षा आहे.

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...