आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:रात्रीच्या सत्तापालटाचं दिवास्वप्न

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का..’ असे विचारायची वेळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणली आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘राज्यातलं सरकार झोपेतच पडेल.’ महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली, त्याच्या काहीबाही बातम्या आल्या. त्यावरून पाटलांनी हवेत तीर मारला आणि ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरू झाली.

आघाडी सरकारने बहुमत गमावलं तर भाजपने जरूर सरकार बनवावं. मात्र, बहुमताचे मार्ग कोणते, हे पाटील सांगत नाहीत. मध्य प्रदेश, कर्नाटकात जसे बहुमत मिळवले, तो कित्ता भाजप राज्यात गिरवू पाहत असेल तर सरकार झोपेत पडू शकते. पाटील यांचे भाकीत म्हणजे चोरीला धाडसी दरोडा म्हणण्यासारखे आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका दिली आहे, ती आम्ही वठवू, असे म्हणण्याचे दिवस जणू इतिहासजमा झाले आहेत.

१२ आमदारांचा विषय काढला की, भाजपला कोरोना आठवतो. मग काेरोनात ‘ऑपरेशन लोटस’ची कुजबूज सुरू होते, त्याचे काय? एकूणच बंगालच्या निवडणुकीतून भाजपने धडा घेतलेला दिसत नाही. अन्यथा, राज्य महामारीशी झुंजत असताना भाजप नेत्यांना रात्रीच्या सत्तापालटाची स्वप्ने दिवसाढवळ्या पडली नसती.

बातम्या आणखी आहेत...