आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सब घोडे बारा टक्के!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा? कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!’ विंदा करंदीकरांच्या या कवितेचीविधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचिती आली. विषय होता, ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक, कायदेशीर गुंत्यांचा. सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनीआपण या समाजांच्यापाठीशी असल्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.प्रत्यक्ष सभागृहात मात्र दोन्ही बाजूंनी समाजहित कमी आणि राजकारणजास्त असेच वर्तन दिसले.सत्ताधारी मंत्र्यांनी इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्याची मागणी करण्याचा ठराव पटलावर ठेवला, तर विरोधकांनी ही केंद्राची नाही तर राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे खुलासे द्यायला सुरूवात केली.

नेहमीप्रमाणे गदारोळ झाला, कामकाज बरखास्त झाले. पण,त्यानंतर जे घडले ते”नेहमी’चे नव्हते. सत्ताधारी एखादा ठराव रेटून नेत असतील, तर विरोधकांनीआवाज उठवण्याची परंपरा नवी नाही. अनेकदा गोंधळ घालणाऱ्या सदस्यांनानिलंबनाला सामोरे जावे लागते. पण, यावेळी विरोधी सदस्यांनी तालिका सभापतींच्या माईकलाच हात घालणे, अध्यक्षांच्या दालतान सत्ताधारी व विरोधक यांच्या घमासन होणे, हे महाराष्ट्राच्या कोणत्या पुरोगामी परंपरेस शोभते, याचे उत्तर दोन्ही बाजूंनी दिले पाहिजे.

संसदीय कामकाजाबद्दल”आदर्श’ घालून देणाऱ्या या सभागृहात अध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ झाल्याची तक्रार पटलावर आली. सत्ताधाऱ्यांच्या हातात कोलित सापडले आणि त्यांनी चार माजी मंत्र्यांसह तब्बल १२ आमदारांवर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई केली.राजकारण खेळत विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या १२ आमदारांना बाहेर काढण्याचे राजकारण केले.चारही पक्षांचे राजकारण झाले. ओबीसी,मराठी समाजाच्या हाती मात्र काहीच आले नाही. उलट सभागृहाच्या इतिहासात गलिच्छ राजकारणाची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...