आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:गल्लाभरू गणितांसाठी बदनामी?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगी वाटेल ती किंमत मोजून, ‘दिव्य मराठी’ने व्यवस्थेला जाब विचारला. मात्र, केवळ सनसनाटी आणि गल्लाभरू गणिते यासाठी आम्ही लेखणीचा वापर कधीच केला नाही. करणार नाही. पत्रकारिता गतिमान झाली असली, तरी या गतीमुळे येणारा उथळपणा किती घातक असू शकतो, हे जळगावातील घटनेने दाखवून दिले. तेथील शासकीय महिला वसतिगृहातील कथित गैरप्रकाराची बातमी ज्या पद्धतीने माध्यमांमधून उमटली, ते पाहता बातमीदारीतील वस्तुस्थिती पडताळण्याचे, माहितीची खातरजमा करण्याचे तत्त्व कुठे हरवले, असा प्रश्न पडतो. समाजमाध्यमांमुळे माहितीचे स्रोत काही पटींनी विस्तारले असले, तरी तिची शहानिशा करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडत नाही. परिणामी दिशाभूल करणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट सगळीकडे फिरत राहतात. अशा बिनबुडाच्या, “फेक’ माहितीमुळे सामान्य माणूस संभ्रमात पडतो, तेव्हा तो विश्वसनीय, अधिकृत माहितीचा स्रोत म्हणून वृत्तपत्रांकडे पाहतो. पण, वृत्तपत्रेही समाजमाध्यमांतील तकलादू माहितीच्या प्रवाहात वाहवत जात असल्याचे प्रकार अलीकडे वारंवार घडत आहेत. जळगावातील प्रकरणातून तर ते ठळकपणे समोर आले. ‘दिव्य मराठी’ने मात्र या प्रकरणात वस्तुनिष्ठता प्रमाण मानली. जे घडले, जसे घडले ते तसेच्या तसे ‘ग्राउंड रिपोर्ट’सह वाचकांपर्यंत पोहोचवले, पण अवास्तव आणि उथळ बातम्या देणे कटाक्षाने टाळले. अन्य दैनिकाने मात्र सनसनाटी निर्माण करणारी बातमी देऊन खळबळ उडवली. मात्र, अशी खळबळ उडवताना अनेकदा समाजमनाचा तळही ढवळून निघतो, याचे भान ठेवावे लागते. ‘दिव्य मराठी’ आणि हे दैनिक ज्या समूहाचे आहे, तो ‘दैनिक भास्कर’ समूह मात्र असे भान ठेवतो. ‘केंद्रस्थानी वाचक’ ठेऊन पत्रकारिता करताना बिनचूक आणि अत्यंत विश्वासार्ह मजकूरच वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आमचा आग्रह असतो. कारण खऱ्या पत्रकारितेत विश्वासार्हतेला पर्याय नाही. म्हणूनच आज ‘दिव्य मराठी’ करीत असलेल्या पत्रकारितेला असाधारण महत्त्व आले आहे. सवंग आणि भडक बातम्या देऊन काही काळ खप वाढवता येतो. पण, त्यामुळे विश्वासार्ह वृत्तपत्र म्हणून कधीही वाचकांच्या मनात स्थान मिळवता येत नाही. गल्लाभरू गणितांसाठी जळगावची बदनामी ज्यांनी केली, त्यामुळे आम्ही व्यथित आहोत. आणि, सर्व माध्यमांना आज आवाहन करतो आहोत की, सावध व्हा. आपला केंद्रबिंदू वाचक आहे, हे विसरू नका.

‘शांत नजरेने कानोसा घ्या’ याचा अर्थ तुम्हाला जे दृश्य दिसते ते भले बोलत नसेल, पण तुम्ही खूप काही ऐकू शकता अशी पकड मिळवा. आयुष्यात जेव्हा अनेक लोकांशी भेटणे होते तेव्हा आपल्या अहंकारामुळे आपण त्यांना नीट समजून घेत नाही. अहंकारामुळेच आपण चांगल्या लोकांना भेटूनही चुकतो. कारण, आपल्यातील अहंकाराशी वेगवेगळे लोक वेगवेगळे वागतात. राजकारणी अहंकाराला गोंजारतो. चापलूस त्याला वाढवतो. स्पर्धक तोडते. पण संत त्याला संपवतात. जेव्हा एखाद्या संताला भेटण्याची संधी मिळेल तेव्हा घाई करू नका. त्यांनी दडवून ठेवलेले खरे रूप ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण, तो स्वत: अहंकार नसणारा. त्याचा प्रदर्शनावर विश्वास नसेल. तो तुम्हाला हे कळूही देणार नाही, त्याने किती सिद्धी कमावली आहे. त्यामुळे संतासोबत राहूनही जे मिळवणे शक्य आहे ते आपण मिळवू शकत नाही. एखाद्या संताची भेट घेताना ती समर्पणाने घ्या, अन्यथा जीवनातील मोठ्या ठेव्याला मुकाल.

बातम्या आणखी आहेत...