आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण खरोखर कलियुगात राहत आहोत. रस्त्यांवरील अनेक विक्रेते टॉयलेटमधून आल्यानंतर क्वचितच हात धुतात आणि फक्त पाणीपुरीच खायला देत नाहीत, तर रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवरूनही अनेक वस्तू देतात! एअरलाइन्ससुद्धा भरपूर पैसे घेऊन एक महिना आधी कालबाह्य झालेले कोल्ड कॉफीसारखे पेय देतात. झोपडपट्ट्यांत कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या गरिबांना बरे करण्याचे आश्वासन देऊन देशातील बनावट डाॅक्टर्स खुलेआम उपचार करतात. आणि त्यांची क्षमता तपासता न आल्याने गरीब त्यांना डॉक्टर मानून शरण जातात. ते केवळ त्यांचे पैसे घेऊन फरार होत नाहीत, तर अनेक वेळा त्यांचे आरोग्यही नष्ट करतात. गुंतवणुकीची आणि चांगल्या परताव्याचीही अशीच कहाणी आहे, त्याच्या नावावर शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. एकंदरीत या युगात सर्वत्र लोभ आहे. आता बहुधा विज्ञानदेखील त्याच मार्गावर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत एक हाय-प्रोफाइल फसवणूक चर्चेत होती. कारण ती एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी आहे. कथेची सुरुवात होते एलिझाबेथ होम्स या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलेल्या १९ वर्षीय तरुणीने उघडलेल्या थेरेनोस स्टार्टअपपासून. ट्यूशनच्या पैशातून टेक आधारित लॅब सुरू केल्यामुळे ती चर्चेत होती. हळूहळू कंपनी ९ अब्ज डॉलर्सची झाली. ती २०१८ मध्ये कोसळली. पारंपरिक पद्धतींपेक्षा जलद, अधिक अचूक रक्ताच्या एका थेंबातून अनेक चाचण्या करू शकणारे क्रांतिकारी तंत्रज्ञान शोधल्याचा स्टार्टअपने दावा केला. २०१४ मध्ये थेरेनोसने त्याच्या तथाकथित क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. त्या वेळी प्रत्येक चाचणीसाठी छोट्या चाचणी नळीइतके थोडे रक्त आवश्यक होते, परंतु थेरेनोसने दावा केला की, ते कोलेस्टेरॉलपासून जटिल आनुवंशिक विश्लेषणापर्यंत शेकडो चाचण्या (२४० पेक्षा जास्त) फक्त एका थेंबाने करू शकतात. स्वयंचलित, जलद, कमी खर्चिक थेरेनोस पद्धत नवीन तंत्रज्ञानासारखी वाटली, ती औषधात क्रांती घडवून आणू शकते आणि जीव वाचवू शकते. अशा प्रकारे कंपनीला मोठा पैसा उभा करता आला. तथापि, अनेक रुग्णांच्या चाचणीचे निकाल चुकीचे होते, त्यानंतर त्यांचे दावे खोटे ठरले. द वॉल स्ट्रीट जर्नलचे दोन वेळा पुलित्झर पारितोषिक विजेते रिपोर्टर जॉन कॅरेरो यांनी २०१५ मध्ये प्रथम हे समोर आणले. स्टॅनफोर्ड येथे रासायनिक अभियांत्रिकीच्या केवळ दोन सत्रांनंतर थेरेसाॅन तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेबद्दल शंकांबद्दल टिप मिळाल्यानंतर जग बदलणारे वैद्यकीय तंत्रज्ञान शोधण्याच्या होम्सच्या कथित क्षमतेमुळे जॉन आणखी उत्सुक झाला. कायदेशीर कारवाईच्या धमक्या मिळूनही थेरेनोसचे माजी कर्मचारी एरिका च्युंग आणि टायलर शुल्त्झ (टायलरचे आजोबा जॉर्ज शुल्त्झ थेरेनोसच्या बोर्डावर होते) यांनी जॉनसोबत त्यांचे कंपनी, तंत्रज्ञान आणि तेथे काम करतानाचे अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली.
{ फंडा असा ः अन्न, आरोग्य आणि गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा त्यात स्वारस्य दाखवण्यापूर्वी किंवा सेवा घेण्यापूर्वी या सर्वांची प्राथमिक तपासणी केली पाहिजे.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.