आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:सकारात्मक कर्म करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक कर्मामागे वासना असते, असे शास्त्रात लिहिले आहे. वासना येते तेव्हा इच्छा येते. कधी कधी संकल्पामागेही वासना असते. त्यामुळे वासना वाईट नाही, पण जीवनातील प्रत्येक कृती वासनेने प्रेरित असेल तर समस्या आहे. काही कृती वासनेपासून मुक्त असाव्यात, असा प्रयत्न करा. ऐकून आश्चर्य वाटेल की, वासनेशिवाय कर्मे कोणती? उदा. आपण दुचाकी चालवत आहोत. आपण न्यूट्रलमध्ये ठेवून गाडी बंद करतो तेव्हा इंजिन थांबते, परंतु गाडी सुरूच राहते. रस्ता सपाट असेल तर थोडा वेळ आणि उतार असेल तर जास्त वेळ चालेल. मात्र, इंजिन बंद झाल्यानंतरही तिच्यात वेग असतो. त्याचप्रमाणे वासना पडल्यानंतरही कर्म सुरूच असते. मग चोवीस तासांत ज्यामागे वासना नाही अशी काही कामे का करू नयेत? त्यातून फक्त इतरांचे हित व्हावे. मग हळूहळू आपण इतरांसाठी करतोय, ही भावनाही कमी होत जाईल. अशी कर्मे केल्याने आपल्यामध्ये खूप सकारात्मकता येते व आपल्याशी संबंधित लोकही खूप सकारात्मक होतात. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...