आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही लोक संभाषणाच्या बाबतीत मिठाईवाल्यासारखे झाले आहेत. ते प्रत्येक शब्द सौद्याच्या पाकातून काढतात. मग समोरच्याला मधुमेह असला तरी गोड खाण्याची इच्छा होते. व्यवसायाच्या दुनियेत पाकात बुडवलेले हे शब्द फलदायी ठरू शकतात, पण ते घरी कधीही वापरू नका. घरात बोलले जाणारे शब्दही गोड असले पाहिजेत, पण ते साखरेसारखे नव्हे, फळासारखे गोड असावेत.
आपल्या ऋषी-मुनींनी अनेक संदर्भात सांगितले आहे की, कथा ऐकताना श्रवणासह तीन गोष्टी केल्या पाहिजेत - ‘चिंतन, मनन आणि ध्यान’. कथा-सत्संगात आपण जे शब्द ऐकतो ते मंत्रासारखे असतात आणि ते चिंतन, मनन आणि ध्यानातून पुढे नेल्यावरच मंत्राचा परिणाम होतो. त्यामुळे आपण एखाद्या शब्दाचा, विषयाचा विचार करतो तेव्हा स्वतःतून थोडे बाहेर पडत असतो. मनन करतो तेव्हा थोडा वेळ थांबतो. पण, ध्यान करताच आपल्या आत्म्यात परत येतो. हा एक अजब प्रवास आहे, पण जेव्हा जेव्हा शब्द जीवनात येतात तेव्हा या प्रवासाकडे अवश्य लक्ष द्या. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.