आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडा:महागडी खरेदी करण्याआधी तुम्ही प्रश्न करता का?

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फंडा असा की, गोष्ट फक्त पैशांची नाही, कुणीही मोठी खरेदी करण्याआधी तुम्हाला समाज आणि जगाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. घरखर्चात ज्याप्रकारे वाढ होतेय. त्यापासून वाचण्याचा कोणताही उपाय दिसत नाही. गेल्या दहा-पंधरा दिवसांत इंधनाचे दर वाढले. यातून पुढचा मार्ग कठीण असेल असे दिसते. यामुळेच गरजांमध्ये आज कार खरेदी करण्यासाठी सर्वाधिक मदतीची गरज आहे. एकीकडे अनेक कारमालक त्यांची कार बदलून कमी इंधन वापरणारी गाडी घेऊ इच्छित आहेत. दुसरीकडे, युवा व्यावसायिकांना कामावर जाण्यासाठी स्वत:चे वाहन हवे आहे. कारण घरून काम करण्याच्या सुविधेची त्यांना सवय झाली. तर तुम्हाला कशा प्रकारचे वाहन घ्यायला हवे? अशी कोणतीही महागडी खरेदी करण्याआधी तुम्ही स्वत:ला पाच प्रश्न करायला हवेत.

१. रशिया-युक्रेन युद्धामुळे कारची किंमत, उपलब्धतेवर काय परिणाम झाला : युद्ध सुरू झाल्यापासून कार उत्पादक स्टीलच्या किमती वाढल्याने त्रस्त आहेत. युद्धात सहभागी दोन्ही देश पिग-आर्यनचे मोठे पुरवठादार आहेत, जे रिफाइंड करून स्टील बनवले जाते. त्याच्या किमतीत तेलाच्या वेगाने वाढ होत आहे. इंटर्नल कम्बशन इंजिनमध्ये कॅटेलेटिक कन्व्हर्टरसाठी आवश्यक पॅलेडियमचा जवळपास अर्धा जागतिक पुरवठा (४६%) रशियातून होतो. रशिया अॅल्युमिनियमचाही सर्वात मोठा उत्पादक आहे, ज्याच्या किमतीत आता इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटनुसार ४०% वाढ होऊ शकते. पोर्शे आणि बीएमडब्ल्यूसारख्या मोठ्या ब्रँड्सने त्यांचे उत्पादन थांबवले आहे, कारण त्यांना त्यांच्या प्रत्येक कारसाठी ५ किमी लांब इलेक्ट्रिक वायर मिळत नाहीये, जे आधुनिक कार चालवण्यासाठी आवश्यक आहे. या केबल्स मुख्यत्वे युक्रेनमध्ये बनवल्या जातात, तेथे सध्या सर्व कारखाने बंद आहेत.

२. एखादी अशी गोष्ट आहे का, जिचा कार उत्पादनावर प्रभाव पडला आहे : हो, सेमीकंडक्टर, ज्याला आपण कॉम्प्युटर चिप्स म्हणतो, त्यांचा तुटवडा जो महामारीचा एक असा परिणाम आहे, ज्याचा पूर्वअंदाज लावला जाऊ शकत नाही. यामुळे नवीन कारचे उत्पादन थंडावले आहे. बहुतेक यामुळेच युज्ड कारच्या किमतीही वाढत आहेत. कार उत्पादकांना २०२३ वा बहुधा २०२४च्या आधी सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील आव्हान दूर होताना दिसत नाही. इंधनाप्रमाणेच त्यांच्या किमतीही जास्त राहतील.

३. इंधनचे दर कधीपर्यंत वाढते राहतील : तेल उद्योगातील तज्ज्ञांच्या मतानुसार स्थिती चांगली नाही आणि किमती सतत वाढत राहतील, मग सरकारने करकपातीचे कितीही प्रयत्न केले तरी. मात्र एक चांगली गोष्ट अशी की, आज अनेक अशी कारची नवी मॉडेल्स आहेत, जे चांगल्या मायलेजचा दावा करतात. विकत घेण्याआधी एक एक्सेल शीट बनवून किमती व फायद्यांची तुलना करा.

४. मग काय डिझेल कार घ्यायला हवी : असे तर डिझेल कार विकत घेण्याचे ठोस कारण दिसत नाही. डिझेलचे दर पेट्रोलच्या तुलनेत वेगाने वाढत राहतील. डिझेलचे दर पेट्रोलपेक्षाही जास्त होतील, असा अंदाज आहे. म्हणून डिझेल कारची विक्री कमीत कमी विकसित देशांमध्ये तरी कमी झाली आहे. याचा अर्थ आहे की, जर तुम्ही आज डिझेल कार विकत घेतली तर ती लवकरच ट्रेंडच्या बाहेर जाईल.

५. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चालवणे किती योग्य असेल : हो, ईव्ही एक तोडगा असू शकतो. मात्र ते प्रत्येक गरजेसाठी उपयोगी नाही. ईव्ही एकदा चार्ज केल्यावर ३०० किमी धावू शकते. मात्र ईव्हीचालकांसाठी आव्हान आहे. सध्या चार्जिंग स्टेशन मर्यादित आहेत. इंग्लंडसारख्या विकसित देशातही जेथे अनेक वर्षांपासून ईव्ही धावताहेत, ईव्हीचालकांना चार्जिंग पॉइंट्सच्या जागेसाठी धावपळ करावी लागत आहे. एक ईव्ही चालवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे, ती घरीच रात्री चार्ज करून घेणे. यामुळे उंच फ्लॅट्सच्या तुलनेत खासगी घरांच्या मालकांना जास्त लाभ होईल, फक्त कॉलनीत चार्जिंग सुविधा असावी. मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन

बातम्या आणखी आहेत...