आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिती वेळा तुमच्या शाळेतील मित्राच्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आठवण करून देण्यात आली आणि तुम्ही शुभेच्छा द्यायला विसरला? किती वेळा तुम्ही तुमच्या सेल्स स्टाफला सांगणे विसरलात की, त्या नव्या व्यक्तीशी बोलून घे, जी तुमच्या दृष्टीने भविष्यात क्लायंट होऊ शकते? मुलीने किती वेळा आठवण करून दिली की तिच्यासाठी हेअर बँड आणायचा आहे आणि घरी जाताच विसरल्याचे आठवते? आणि किती वेळा रात्र खराब झाली, कारण बाळासाठी डायपर आणणे विसरले आणि पत्नी सांगून थकली की, ‘जर तुम्हाला ऑफिसशिवाय दुसरे काही लक्षात राहत नाही तर तुम्ही माझ्याशी लग्न का केले?’ बिचारा... तिला माहिती नाही की त्याने कोणाला काय काम दिले आहे हे लक्षात ठेवण्यात पती अर्धा दिवस घालवतो. जर तुम्हीही अशाच प्रकारचे मॅनेजर असाल तर ही कल्पना तुमच्यासाठी आहे. तुम्ही मुलाची नेहमी माफी मागू शकता आणि वीकेंडवर आश्वासन पूर्ण करू शकता. मात्र कोणत्याही यशस्वी मॅनेजर वा टीम लीडरसाठी सर्वाधिक त्रासदायक गोष्ट म्हणजे त्या कर्मचाऱ्यांकडून कामाचे अपडेट घेणे विसरणे आहे, जे तुमच्या दबावात विसरण्याच्या सवयीचा (स्वाभाविक आहे दबावामुळे डिमेन्शियामुळे नव्हे) फायदा घेतात आणि कधीच काम पूर्ण करत नाहीत, ठरलेल्या वेळी रिपोर्ट करत नाहीत. मला यासाठी माझे एक प्रकाशक मित्र डॉ. पीयूषकुमार यांच्याकडे एक मार्ग मिळाला. त्यांच्या फोनमध्ये काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स आहेत जसे- ‘मी, मायसेल्फ’ आणि ‘मी, मायसेल्फ न्यूएस्ट.’ त्यांनी पहिला ग्रुप त्या कर्मचाऱ्यांसाठी बनवला आहे, जे थेट त्यांना रिपोर्ट करतात आणि मग त्यांना रिमूव्ह केले. मात्र फोनवर ग्रुप कायम राहिला तर बाकीच्यांनी असा विचार करून डिलीट केला की, साहेबांना बहुतेक जाणीव झाली असेल की ऑफिसचा ग्रुप आधीच आहे, यामुळे दुसऱ्याची गरज नाही. आणि मग त्यांनी मुख्य ग्रुपवर काम सोपवून, जेव्हाही रिपोर्टची गरज असायची तेव्हा ती आपल्या ‘मी मायसेल्फ’ ग्रुपमध्ये टाकणे सुरू केले. घरी परतताना ते कारच्या मागच्या सीटवर बसून सर्वांना एक एक करून पूर्ण होणारे रिपोर्ट मागायचे. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले तर ते काम त्या ग्रुपमधून डिलीट करायचे, ज्यात ते एकमेव सदस्य आहेत. जेव्हाही त्यांना नवीन कल्पना सुचायची तर ती ‘मी, मायसेल्फ न्यूएस्ट’ ग्रुपमध्ये शेअर करायचे, जो त्यांनी पत्नीला जोडून बनवला होता आणि नंतर तिला रिमूव्ह केले होते. त्यांना वाटते की, मेंदू सुपरकॉम्प्युटर आहे आणि 24/7 विचार करतो. आपण ते मुद्दे लिहीत नाहीत म्हणून ते उडून जातात. आणखी दोन गोष्टी ते करतात. दिवसभरात जेथेही जातात तेथे स्टिकर्स-पेन्सिल ठेवतात, टॉयलेटमध्येही. ते लगेच लिहून घेतात.
{फंडा असा की, जर मोबाइलवर तुमचा ‘मी मायसेल्फ’ व्हॉट्सअॅप ग्रुप आहे तर तुम्ही कोणतेही काम लक्षात ठेवू शकता, मग ते कोट्यवधीचे टेंडर भरण्याचे काम असो की सहा महिन्यांच्या बाळासाठी डायपर घेणे. तुम्ही आयुष्यात बहुतेकच काही विसरू शकाल. कारण तुम्ही तुमचे सहा ते सात तास मोबाइलवर घालवता.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.