आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:तुम्हाला ‘गॉब्लिन मोड’मध्ये जगणे माहीत आहे का?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर कोणी रात्री दोन वाजता उठून किचनमध्ये ओरडत स्वत:साठी विचित्र जेवण तयार करत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? हे जेवण मग मॅगीत मधापासून ते चॉकलेट सॉसमध्ये मिरची टाकण्यापर्यंत असू शकते. माझे काही मित्र सायंकाळी ‘रम आणि रसम’ ड्रिंक बनवतात. तिखट रसमला काळ्या रममध्ये घुसळतात. दुसऱ्यांना चकित करणाऱ्या अशा वागण्याला ‘गॉब्लिन मोड’ म्हणतात. हा नवीन शब्द असून ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या ‘वर्ड ऑफ द इयर-२०२२’च्या शर्यतीत आहे. तो जिंकण्याची शक्यताही आहे. कारण त्याला ३.१८ लाखांवर मते मिळाली आहेत. वास्तविक गॉब्लिन एका छोट्या भुताला म्हटले जाते. ते अनेक युरोपियन लोककथांतील एक भाग आहे. यात भूत वेगवेगळ्या शक्ती, वागणूक आणि रंगरूपाचे असून अशा कथा कोणत्या देशातील आहेत यावरच ते अवलंबून आहे. ते खट्याळ तसेच दुष्टही असतात. वर्क फ्रॉम होम कल्चर आणि कामाच्या धबडग्याने जगभरातील लोकांची जीवनशैली बदलली आहे. उदा. जयपूर, इंदूर, रायपूर किंवा जमशेदपुरात राहणारी एखादी व्यक्त जर अमेरिकी कंपनीसाठी काम करत असेल तर त्याची झोपण्यापासून ते जेवणापर्यंत वेळ बदलून जाते. त्यामुळे ज्या किचनमध्ये साधारणपणे ९ नंतर कोणतीही हालचाल नसते, तेथे रात्रीही हालचाली दिसतात. ‘गॉब्लिन मोड’ शब्द अशा लोकांसाठी नाही, ज्यांना गडबडीच्या वेळी नाइलाजाने काम करावे लागत आहे. मानसशास्त्र तज्ज्ञांच्या मते अशा लोकांना अपराधीपणा जाणवतो आणि इतर लोकांच्या सामान्य जीवनात व्यत्यय निर्मााण करण्यासाठी क्षमा मागत असतात. पण हा शब्द अशा लोकांसाठी आहे, जे अर्ध्या रात्री खटपट करून दुसऱ्यांना अस्वस्थ करतात. परंतु याबाबत त्यांना लाजही वाटत नाही किंवा अपराधीही वाटत नाही. ते असे कपडे नेसतात, जे त्यांना योग्य वाटतात. भारतात ऐतिहासिकरीत्या अशी परंपरा आहे की, जिभेला जे चांगले वाटते तेच आपण खातो आणि दुसऱ्यांच्या नजरेत जे चांगले वाटते तेच नेसतो. परंतु ‘गॉब्लिन मोड’मध्ये राहणारे याची पर्वा करत नाहीत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत हा शब्द झपाट्याने प्रसिद्ध झाला. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, असे लोक वीकेंडपूर्वी आपली खोलीही स्वच्छ करत नाहीत. त्यांच्यात “हे माझे घर आहे, मला वाटेल तसे राहील’ अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. एकदा ‘गॉब्लिन मोड’मध्ये राहण्याची सवय झाली तर पाहुणे आल्यावरही ती बदलत नाही. असे लोक समाजात नामानिराळे होतात. आपण सामाजिक प्राणी आहोत आणि समाजाने काही नियम बनवलेत. यापैकी एखादा नियम तोडल्यावर कोणी परेशान झाला नाही तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. परंतु जेव्हा नियम तोडणे इतर लोकांसाठी गैरसोयीचे ठरल्यास समाज नियम मोडणाऱ्यास टोमणे मारू लागतो. याचेच नाव‘गॉब्लिन मोड’ आहे. त्यामुळे जर कोणी पाणीपुरीत बटाट्याऐवजी श्रीखंड टाकून खाणार असेल तर त्याला तसे करायचे असते. अशांना काय म्हणावे हे मला माहीत नाही, परंतु पाणीपुरीच्या ठेल्यावर अशी मागणी करणाऱ्यास इतर लोक नक्कीच विचित्र म्हणतील. यालाच आता जगण्याची गॉब्लिन पद्धती म्हटले जात आहे. फंडा असा की, जर आपण समाजाचे नियम पाळणार नसू तर तो आम्हाला अनेक नावांनी बोलावू शकतो. या नावांमुळे आम्ही त्रस्त होणार नाही तेव्हा आम्ही भुताप्रमाणे म्हणजे ‘गॉब्लिन मोड’मध्ये राहू शकतो.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...