आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी जेव्हा मुंबईत असतो तेव्हा रोज एका स्थानिक बागेत जात असतो. तेथे एक महिला रोज बागेत पळताना दिसते. आत्मविश्वासाने बांधलेल्या त्यांच्या पोनीटेलचे केस हवेत उडत राहतात. ती खास वाटते. संध्याकाळी ऊन उतरल्यावर आणि सूर्योदयापूर्वी त्या नेहमी बागेत असतात. त्या इअरप्लग लावत नाहीत. सर्वांशी बसून बोलतात. पळताना त्यांचे हात नेहमी बॉक्सिंगच्या मुद्रेत असतात. ती गोरी महिला ब्रँडेड ट्रॅक पेंट्स आणि स्टायलिश शब्द असलेली टी-शर्ट घालते. हसतमुखाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.
खरं तर, त्या ७६ वर्षांच्या आहेत. मला त्यांचे वय कसे कळाले, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र त्यांचे वय त्यांच्या टी शर्टवर लिहिलेले होते. एकीकडे महिला वय लपवतात मात्र त्या त्यांच्या उलट आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:ला एक टायटल दिले आहे.. ‘फिटिझन’ म्हणजे फिट सिटिझन. ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेले लोक बागेत व्यायाम करताना दिसणे सामान्य झाले आहे. मी जेव्हा श्वानाला सकाळी वॉकवर घेऊन जातो, तेव्हा काॅलनीच्या बागेत फिरणारे १०० टक्के लोक वरिष्ठ नागरिक असतात. सॉरी फिटिजन्स!
जगभरातील अनेक फिटनेस ब्रँड्सना याची जाणीव झाली की, ५७ ते ७० वयोगटातील बरेच लोक व्यायाम करतात. त्यामुळे त्यांची उत्पादने विकण्यासाठी या वयोगटावर लक्ष केंद्रित करत आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी जिम कंपन्यांमधील सदस्यत्वामध्ये १४ टक्के वाढ झाली. एवढेच नव्हे तर लांसेट (सर्वात लोकप्रिय मेडिकल जर्नल)च्या २०२१ च्या ‘फिजिकल अॅक्टिव्हिटी गाइडलाइन फॉर ओल्डर पीपुल’ रिपोर्टनुसार, ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांसाठी कुणाच्या देखरेखीत व्यायाम सुरक्षित आहे आणि त्यांच्या कार्यात्मक आणि संज्ञानात्मक क्षमतेतील घट रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे दर्शविले गेले. परंतु दुर्दैवाने, डॉक्टर बऱ्याच अशक्त वृद्ध लोकांसाठी औषधी लिहून देतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील इष्टतम वृद्धत्व कार्यक्रमाचे संचालक आणि सार्वजनिक आरोग्य डॉक्टर मुइर ग्रे म्हणतात, सामान्यतः निर्धारित औषधांपैकी १० टक्के वाया जातात. त्याऐवजी एखाद्याला व्यायाम करण्याचा सल्ला दिल्यास आपल्यापैकी बरेच लोक निरोगी राहतील कारण अधिक शक्ती, तग धरण्याची क्षमता, कौशल्य आणि लवचिक शरीरामुळे सर्वच ज्येष्ठ व्यायाम करत नाहीत. मुइर सांगतात, महामारीनंतर ज्येष्ठांनी व्यायाम करण्याचा आत्मविश्वास गमावला.
इंग्लँडमध्ये ‘लिव्ह लाँगर बेटर’ नावाचे अभियान सुरू आहे. त्यांना जीवन अमृत मिळाल्याचा त्यांच्या सदस्यांचा दावा आहे. मुइर सांगतात, सर्व लोकांना, विशेषतः वृद्धांना, जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी काय चांगले, याची स्पष्ट कल्पना असायला हवी. वृद्धापकाळ समस्यांचे कारण नसते. उपक्रमांच्या अभावाचा हा परिणाम असतो. पहिलीच नोकरी कुणाला बैठे मिळाली तरी तब्येत ढासळू शकते. या आधुनिक जगात तीन ‘सी’ समस्या निर्माण करत आहेत. संगणक, कार, कॅलरीज! नियमित व्यायाम आणि तंदुरुस्त होण्याचे ध्येय हृदयविकार, मधुमेह, स्मृतिभ्रंश यांचा धोका कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, मानसिक आरोग्य, झोप, सामाजिक कौशल्ये आणि पडण्याचा धोका कमी करते. एक ८० वर्षीय ब्रिस्क वॉकर म्हणतात, ‘मला अजूनही वाटते माझ्या पायात वसंत आहे आणि माझ्यामध्ये खूप जीव शिल्लक आहे.’ एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.