आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रँट कार्डोन यांचे पुस्तक “बी ऑब्सेस्ड ऑर बी अॅवरेज’ आपल्याला स्पष्ट करते की, जिद्द, समर्पण आणि निष्ठा, संकल्पाशिवाय यश मिळत नाही. तुम्ही स्वत:च्या विकासात जी गुंतवणूक करता, त्यातून तुमचे आयुष्य निश्चित होते.
यश रेडिमेड नसते वास्तव आहे की, कोणीही तुम्हाला ताटात सजवून यश देत नाही. रात्रीतून यशस्वी होण्याची कोणतीही जादू नाही. त्याऐवजी सातत्यातून यश मिळते. तुम्हाला सतत कठोर परिश्रम घ्यायचे असतात. जर तुम्ही आज आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर- जेथे नाहीत, जेथे खरेच तुम्हाला व्हायचे होते, तर खूप शक्य आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तेवढे प्रयत्न केले नाहीत, जेवढे तुम्ही करू शकत होते. जगात तेव्हाच दबाव निर्माण करू शकाल, जेव्हा तुमचे तुमच्यावर पूर्ण नियंत्रण असेल. आपल्या यशासाठी तुम्हीच जबाबदार आहात. यश रेडिमेड नसते, ते मिळवावे लागते.
यश जबाबदारी आहे यशासाठी एक मंत्र लक्षात ठेवा : जर एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता तर ती करायलाच हवी. तुमचे कुटुंब, तुमची मुले, तुमचे मित्र यांचा हक्क आहे की, त्यांना प्रत्येक गोष्टीत तुमची सर्वाेत्तम कामगिरी मिळावी. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की यशस्वी होणे तुमची जबाबदारी आहे, तुमच्या आयुष्यात एक प्रकारे स्थिरता येते.
पूर्ण वेळेचे समर्पण पार्ट टाइम ऑब्सेशन सारखी कोणती गोष्ट होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी वेळोवेळी दृढनिश्चयी होऊ शकत नाहीत. जेव्हा तुम्ही आयुष्यात काही तरी करण्याचा निश्चय करतात तर मग त्यात काही फरक पडत नाही. याचा अर्थ नाही की तुम्ही सुटी घेणार नाहीत. मात्र, चांगले होणे आणि यशस्वी होण्याची सातत्य असणारी जिद्दच तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते.
जास्त स्पष्ट रोडमॅप स्वत:ला सतत प्रेरित करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे आपल्या प्रगतीचा नियमित अंदाज घ्या. जर तुम्ही तुमच्यासाठी काही ध्येय ठरवता आणि रोज आपल्या प्रगतीचा अंदाज घेता तर तुमच्या समोर आपला रोडमॅप जास्त स्पष्ट होत जातो.
ध्येयाची कल्पना करा स्वत:ला रोज लक्षात आणून द्या की, तुमचा खरा हेतू काय आहे. आपली ध्येय लिहा, ते वाचा, ते डोक्यात ठेवा. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका लहान संकल्पाने होते. तुमच्या भविष्याची कल्पना करा आणि त्याबाबत ऑब्सेस्ड व्हा. ही गोष्ट लक्षात घ्या की लक्ष गमावणे खूप सोपे आहे आणि त्याच्याशी तुम्हाला झगडावे लागेल.
व्यापक विचार करा आपल्याला जे मिळवायचे आहे, त्यासाठी जर तुम्हाला नियमितपणे खूप अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्हाला आवडत नाहीत, जसे ईमेल्सचे उत्तर देणे किंवा फोन कॉल्स करणे- तरीही त्या प्रामाणिकपणे करा. मुख्य ध्येय नजरेआड होऊ देऊ नका. स्वत:ला वारंवार विचारा की, ही गोष्ट मला ध्येयाकडे नेत आहे का? व्यापक विचार करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.