आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचला, याचे उत्तर शोधा.. या रविवारी मुलांच्या कपड्यांच्या एखाद्या मोठ्या स्टोअरमधील कॅश काउंटरजवळ किंवा पॉइंट ऑफ सेलजवळ उभे राहा व पालकांची प्रतीक्षा करा. ते आपल्या मुलांसाठी काय खरेदी करतात आणि का खरेदी करतात ते बघा. तोपर्यंत मी तुम्हाला यामागील कारण सांगतो. कारण लोकांत मुलांसाठी निळा आणि मुलींसाठी गुलाबी रंगच चांगला आहे, ही जुनी सवय रुळली आहे. २००० मध्ये फ्लॅश पिंक्स आणि डीप ब्ल्यूला सर्वात मोठे फॅशन स्टेटमेंट मानले जात होते. रेड कार्पेटवर पिंकचाच बोलबाला होता. परंतु या वर्षी एक नवीन ट्रेड आहे ‘जेंडर न्यूट्रल’! जेथे आयांना वाटते की, हा बदलत्या जगाचे द्योतक आहे, तर बहुतांश आयांना वाटते की विकसित होत असलेल्या शिशूंवर म्युटेड टोन्स किंवा फिकट, धूसर रंग नकारात्मक परिणाम करतात.
भारताचे रंगावरील प्रेम कोणापासून लपून राहिले नाही. अनेक डिझायनर आणि रंगांच्या जाणकारांना माहिती आहे की, आम्ही पाश्चिमात्यांना रंगीत होण्यास प्रेरित केले आहे. रणवीर सिंगसारखा अभिनेता आपल्या बोल्ड पावलांनी पिंकला दुसऱ्याच स्तरावर नेत आहे, हा मुद्दा वेगळा. तरुण माता तर त्याचे चित्रपट अत्यंत मग्न होऊन बघतात. परंतु एका प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकी आहे की, त्या आपल्या मुलांनाही असे कपडे घालायला लावतील का? आपले पूर्वज म्हणायचे की रंगांचा आपल्या वागण्यावर परिणाम होतो. त्यामुळेच ते मंदिरात जाताना पांढरे कपडे घालत होते. मी पॉइंट ऑफ सेलवर जाऊन पालकांशी बोलणार आहे, तोपर्यंत तुम्ही कपडे धुण्याच्या साबणांच्या जाहिराती आठवा ज्यात मुलांच्या कपड्यावर डाग दाखवले जातात. हे यासाठी की आैद्योगिक क्रांतीमध्ये अनेकांना वाटायचे, पुरुष बाहेर कामाला जातात, विशेषत: कारखान्यांत, तर महिला त्यावेळी दुसऱ्या जबाबदाऱ्या निभवतात. तेव्हापासूनच असा समज निर्माण झाला की, जेथे पुरुष एखाद्या समारंभात जाण्यासाठी कपडे परिधान करतात त्यावेळी महिलांच्या कपड्यांच्या निवडीत मौजमजेची भूमिका अधिक असते. आता हाच समज मुलांपर्यंतही पोहोचला आहे.
तुमची नजर मुलांच्या कपड्यांच्या विभागावर वळवा. मुलींच्या विभागात कापडी आणि हलके आणि टुलचे रेशमी, जाळीदार कपडे असतील. तर मुलांच्या विभागात डेनिम आणि लेदर आढळतील. मुलांच्या टी शर्टवर डायनॉसोर आणि मुलींच्या पोशाखावर पऱ्यांचे चित्र दिसतील. हीच बाब चप्पल-जोड्यांवरही लागू दिसते. मुलींच्या जोड्यांचे सोल पातळ तर मुलींचे जाड. याचा संबंधही मुले खेळत असलेल्या खेळांशी आहे. समज असा की, मुलांसाठी मजबूत कापडांची मागणी असते. कारण ते हिंडतात, फिरतात. तर मुलींचे कपडे सुंदर असावेत. अनेक पालकांना वाटते की, मुलींनी ब्ल्यू आणि मुलांनी पिंक नेसण्यात काहीच वाईट नाही. पण ते आपल्या मुलांबाबत अशी जोखीम उचलण्यात निश्चित नाहीत. एका संशोधनानुसार मुले प्रत्येक वस्तू एखाद्या छोट्या स्पंजप्रमाणे शोषतात. फंडा असा की, आम्हा मनुष्याच्या विचारांवर आणि वागण्यावर आम्ही परिधान केलेल्या विशेष कपड्यांचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना असे कपडे नेसवा, ज्या रूपात तुम्ही त्यांना भविष्यात बघू इच्छिता. येथे निळ्या किंवा गुलाबीमुळे काहीच फरक पडत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.