आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची सुरक्षा कशी करावी?:अँड्रॉइड फोनमध्ये नेहमी ब्ल्यूटूथ ऑन ठेवू नका, बॅकअपही बनवा

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयफोन वा अँड्रॉइड स्मार्टफोनची चोरी , फुटणे किंवा हरवल्यावर तुम्ही अडचणीत येता. कारण,त्यात ठेवलेला बँकिंग, अन्य कामांशी संबंधित संवेदनशील डेटा आणि संस्मरणीय फोटोही जातात. ही स्थिती टाळण्यासाठी काही सोप्या उपायांतून स्मार्टफोनची सुरक्षा वाढवता येऊ शकते. तज्ज्ञ सांगताहेत फोनच्या सुरक्षेचे उपाय...

{फोनच्या सुरक्षेचे सोपे उपाय कोणते आहेत? फोन हरवला जातो किंवा चोरी होतो तेव्हा त्यातील डेटा प्राप्त करण्यासाठी काहीही करू शकत नाहीत. अशी स्थिती टाळण्यासाठी ब्लूटूथ नेहमी चालू ठेवू नये. फोन जेव्हा हरवतो तेव्हा तो कुणी अनलॉक करू नये यासाठी तुमच्याकडे आयफोन असेल तर त्यात ऑटोमॅटिक लॉक सेट करा. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले आणि ब्राइटनेसवर जा. तेथे ऑटोलॉक आणि वेळ टाका. अशा पद्धतीने अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले अँड लुक फॉर ए टाइमआऊट किंवा स्लीप पर्याय निवडा. {डेटा प्राप्त करण्यासाठी काय करावे? स्मार्टफोन आणि अनेक लॅपटॉपमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेले टूल्स या कामी खूप फायदेशीर आहेत. यासाठी फाइंड इट मोड ऑन करून ठेवा. हरवल्यावर तुम्हाला त्याचे लोकेशन समजू शकेल. टर्न ऑन डिव्हाइस सेट करण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीवर जा. यानंतर फाइंड माय डिव्हाइस किंवा ट्राय सिक्युरिटी वा गुगल सिक्युरिटी निवडा. {आयएमईआय नंबरने काय मदत मिळेल? फोन निर्माता प्रत्येक डिव्हाइसचा आयएमईआय क्रमांक देतो. आयएमईआय क्रमांकासोबत मिळणारे बिल सांभाळून ठेवा. यासोबत त्याची डायरीत नोंद करा. याशिवाय अँड्रॉइड फोनचा बॅकअप आवश्य सेट करा. यासाठी सेटअप डेटा बॅकअपवर जावा आणि मॅनेज बॅकअप निवडा.

बातम्या आणखी आहेत...