आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:एखाद्या संस्कृतीचे उत्पादन होऊ नका, आपली संस्कृती निर्माण करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२० वर्षांपूर्वी मी पत्रकार म्हणून कान्स फिल्म फेस्टिव्हलचे कव्हरेज करत होतो तेव्हा मी फ्रान्समधील निस ते कान्सपर्यंत भाड्याच्या कारने जात असे. काही वेळा स्थानिक पोलिस या उच्चभ्रू कार्यक्रमाला पाहुण्यांसोबत जात असत. ते सहसा बसण्यासाठी पुढची सीट निवडत आणि बसल्यावर लगेच सीटबेल्ट लावत, नंतर पाहुणे किंवा ड्रायव्हरकडे पाहून हसत. पोलिसाला असे करताना पाहून मागे बसलेले दोघेही काहीही न बोलता तसेच करायचे. समुद्रकिनाऱ्यालगतचा १६ मैल लांबीचा रस्ता आजूबाजूच्या झाडी-झाडांमुळे सुंदर होता आणि गाडीचा वेगही चांगला असे. ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे १ नोव्हेंबरला मी ऐकले की, महाराष्ट्र-कर्नाटकसारख्या काही राज्यांनी सीट बेल्ट न लावल्यास १००० रु. दंड जाहीर केला आहे, मागे बसणाऱ्यांनाही. प्रवाशांना नवीन नियम मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी निदर्शनास आणले की, यात सर्व कार येत नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करणे कठीण होईल. ऑटोरिक्षा-सिटी बसमध्ये अशी तरतूद नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कधी कधी प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका असतो, यात काही शंका नाही. पण लक्षात ठेवा, बससारखी वाहने आकाराने मोठी असतात आणि त्यात कारपेक्षा कमी दुखापत होण्याची शक्यता असते. ऑटोरिक्षांच्या वेगाची तुलना कारशी होऊ शकत नाही. त्या सहसा शहरातच मर्यादित अंतरातच धावतात. ऑटोरिक्षा कधी कधी आंतरराज्यीय वाहने म्हणून काम करतात, विशेषत: लॉकडाऊन असताना, ही गोष्ट वेगळी आहे!

विशेष म्हणजे, एका वेगळ्या गटाने चतुराईने उघड केले कीस जीप चालवताना पोलिस स्वत: पुढच्या सीटवरही बेल्ट घालत नाहीत, ते दुचाकी चालवतानाही हेल्मेट घालत नाहीत. मी या युक्तिवादाशी पूर्णपणे सहमत आहे. पोलिसांनी नियम पाळले तर लोकही त्यांचे पालन करतील. परदेशात गेला असाल तर लोक जास्त शिस्तप्रिय आहेत हे तुम्ही पाहिले असेल. याचे कारण असे की, शीर्षस्थानी असलेले लोक त्यांच्या सुरक्षिततेसह वैयक्तिक शिस्तदेखील पाळतात आणि इतर प्रश्न न करता त्यांचे पालन करतात. यामुळेच सीट बेल्ट न बांधण्यापेक्षा अतिवेग-सिग्नल तोडण्याचे गुन्हे त्या देशांमध्ये जास्त प्रमाणात घडतात. तिथे सीट बेल्ट हा निव्वळ वैयक्तिक शिस्तीचा भाग आहे. अनेक अपघातांत आढळले की, सीट बेल्ट लावलेल्या समोरील प्रवाशाचा जीव वाचला आणि मागच्या प्रवाशाचा सीट बेल्टची सूचना न पाळल्यामुळे मृत्यू झाला - सायरस मिस्त्री यांचा मृत्यू हे याचे ताजे उदाहरण आहे. आपल्या देशात सुरक्षितता संस्कृती नाही. अमेरिकन सायकाॅलॉजिकल असोसिएशनच्या नियतकालिकात गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका अध्ययनात दावा करण्यात आला की, ज्यांना स्वतःवर नियंत्रण नसल्याचे वाटते त्यांना आदेश देणारी संस्कृती आवडते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी असे कठोर नियम करण्याचे हेच कारण आहे. कठोरपणाची ही संस्कृती लोकांच्या वैयक्तिक नियंत्रणाची भावना कमी करून सामूहिक नियंत्रणाची भावना वाढवते. अखेर हे केवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे आणि सर्वाधिक नुकसान कार-एसयूव्ही तसेच टॅक्सींचे होत असल्याने एजन्सींना कठोर नियम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, एजन्सींच्या कर्मचाऱ्यांनीच ते पाळले तर त्याचे महत्त्व वाढेल.

फंडा असा ः एखाद्या शहराला निवडलेल्या संस्कृतीचे उत्पादन बनवू नका, त्याऐवजी आपण ज्या संस्कृतीत राहू इच्छितो त्याला आकार देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...