आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फ हेल्प:बदलाला घाबरू नका, फायदा घ्या

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीडिंग चेंज
बदलाकडे संधीच्या रूपात पाहायला सुरू करा

हुशार लोक बदलाकडे संधी म्हणून पाहतात. ते बदलापासून फायदा करून घेण्याच्या पद्धती शोधतात. यशस्वी होण्यासाठी हा दृष्टिकोन हवा. बदलाचे स्वागत तुम्ही नवीन संधीच्या रूपात करू शकता. नवीन पुढाकाराला तुम्ही आपला उत्साह पुन्हा जागृत करण्यासाठीचा सुयोग्य मार्ग म्हणून स्वीकारू शकता. जीवनात बदल तर होतीलच आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील.

फर्स्ट ब्रेक ऑल द रूल्स
परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला शिका

जीवनात तुम्हाला त्या प्रत्येक क्षेत्रातील बाबींवर विचार करावा लागेल, ज्या तुम्ही करू शकता. जेणेकरून त्या प्राप्त करण्याच्या तुमच्या शक्यता वाढू शकतील. स्वत:ची जी परिस्थिती असेल, त्यावर नियंत्रण मिळवायला शिका. तुम्हाला जे व्हायचे आहे, ते तुमच्यावरच अवलंबून आहे, हे स्वीकारल्यानंतरच यश मिळेल. तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.

अॅटॉमिक हॅबिट्स
सवयींना बदलण्यासाठी पक्के नियोजन करा

तुमच्या अंगी एखादी वाईट सवय आहे, हे माहीत असणे पुरेसे नाही. सुधारणा करण्यासाठी आपल्या उद्दिष्टावर लक्ष ठेवायला हवे आणि उद्दिष्टप्राप्तीच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर विचार केला पाहिजे. तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळा बनू शकणाऱ्या सवयींबाबत विचार करायला सुरू करा आणि त्या अनुषंगाने त्यांचा सामना करण्यासाठी योग्य असे नियोजन तयार ठेवा.

बातम्या आणखी आहेत...