आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजकाल काही विधी असे झाले आहेत की, आधी काय होते, काय व्हायला हवे आणि आता काय होत आहे हेच कळत नाही. आता लग्नाचेच बघा. आजकाल मला लग्नाच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते. मी पाहतो की, आधी लग्नात फोटो सेशन असायचे, आता फोटो सेशनच्या निमित्ताने लग्न आहे. मग लग्नाच्या आठवणी फक्त छायाचित्रांच्या माध्यमातूनच जिवंत राहतील? दांपत्य जीवनातील सर्वोत्तम अल्बम म्हणजे हृदय. विवाह सोहळ्यात मंत्रोच्चारांना महत्त्व आहे. ते केवळ ब्राह्मणाकडून केले जाणारे कृत्य नाही. त्या मंत्रांमध्ये ऋषी-मुनींनी स्त्री-पुरुषाला शरीराच्या पलीकडे नेऊन आत्म्यापर्यंत प्रवास करवून दिला आहे. हे दोघे एकमेकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचले नाहीत तर त्यांच्या जीवनातील शांततेचे स्वरूपही बदलून जाईल. आजकाल लोकांच्या जीवनात शांततेचे तीन प्रकार आहेत. पहिली आहे डिझाइन. शांततेला डिझाइन केले गेले आहे. दुसरी म्हणजे आकार. यामध्ये लोक जीवनात शांतता आणत आहेत, तर प्रत्यक्षात तिसरा खरा चेहरा आहे, तो शांततेचे रूप म्हणजेच सौंदर्याचा आहे. जीवन तेव्हाच सुंदर असते जेव्हा आनंदासोबत शांतता असते. शांतता मिळताच शरीरातून सकारात्मक लहरी निघायला हव्यात. म्हणूनच आपण कितीही आधुनिक असलो, श्रीमंत असलो, तरी काही विधींमागील ईश्वरभावना विसरता कामा नये.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.