आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला जिंकू देऊ नका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये आणखी एका निष्पाप हिंदूची दहशतवाद्यांनी हत्या केली. गोष्टी बिघडत चालल्या आहेत. काश्मीरमधील सामान्य लोकांना शांतता हवी आहे, मग त्यांचा धर्म कोणताही असो. कलम ३७० अंतर्गत काश्मीरमध्ये सहा दशकांसाठी राज्याला विशेष दर्जा मिळाला, परंतु हिंसाचार वाढला आणि काश्मिरी हिंदूंना घरे सोडून भटके बनण्यास भाग पाडले गेले.

विशेष दर्जा काढून तेथील उद्योजक आणि शांतताप्रिय लोकांना आर्थिक आणि संरचनात्मक मदत जोडणे हा नवा पर्याय होता. पण, दहशतवाद्यांना हा त्यांच्या अस्तित्वाला धोका वाटला, त्यामुळे ते आक्रमक झाले. हे हल्ले हिंदूंवरच नाहीत, तर मुस्लिमांवरही आहेत. ज्यांना शांततेत व्यवसाय करून जीवन सुखी करायचे आहे अशा काश्मिरी मुस्लिमांनाही याद्वारे घाबरवले जात आहे. काश्मिरी तरुणांना रोजगार आणि उद्योगात आणण्यासाठी विविध नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांशी कठोर वागण्यासोबतच सरकारने त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधीही दिली आहे. आता शांतता आणि विकास हवा असेल तर स्थानिक काश्मिरींनाही धर्माच्या पलीकडे जाऊन दहशतवाद्यांना समाजाचा शत्रू मानून त्यांचा खात्मा करण्यासाठी सरकारच्या पाठीशी उभे राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...