आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑफिसमधील कामासोबतच अनेक जण आपले वैयक्तिक आयुष्यही शेअर करू लागतात किंवा मत बनवून सहकाऱ्यासोबतचे नाते बिघडवतात. या सर्व गोष्टी करिअर आणि प्रगतीमध्ये अडथळे बनतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी नेहमी काही गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून कामावर लक्ष केंद्रित राहून प्रगतीकडे वाटचाल करता येईल.
कामावर लक्ष केंद्रित करा प्रत्येकाने कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दुसरा जोडीदार काय करतो आहे किंवा त्याच्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, हे शोधण्यात वेळ वाया घालवू नका. कामात सुधारणा कशी करावी, नवीन कल्पनांवर काम कसे करावे, या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर करिअरमध्ये पुढे जाल आणि अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. आपल्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी दररोज १५-२० मिनिटे काढा. यादरम्यान तुम्हाला स्वतःमध्ये काय नवीन पाहायचे आहे, कोणत्या गोष्टींवर काम करायचे आहे, आपण स्वतःमध्ये आणि कामामध्ये कशी सुधारणा करु शकतो, याचा विचार करा. आपल्या कामाशी संबंधित सगळी माहिती ठेवा.
घर आणि काम वेगळे ठेवा कार्यालय हे आपले घर नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तणाव, काळजी, चिडचिडेपणा घराबाहेर सोडूनच घरात या. असे केले नाही तर दोन्ही ठिकाणी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता येणार नाही. ऑफिसमध्ये येण्यापूर्वीच घराची चिंता बाहेर सोडा. त्यामुळे आपण परिश्रमपूर्वक कार्य करण्यासाठी सक्षम व्हाल. होय, काही वेळा तुम्ही ऑफिसमधील अनुभव कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करू शकता, पण समस्या आणि तणाव शेअर करू नका.
पाठीमागे काही बोलू नका अनेकदा असे दिसून येते की सहकाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल बोलले जाते किंवा त्याच्या कोणत्याही कमतरतांबद्दल चर्चा केली जाते. हे चुकीचे आहे. एखादी व्यक्ती समोर नसेल तर त्याच्याबद्दल चर्चा करू नका. तो समोर असेल, तरच त्याच्याबद्दल त्याच्यासमोर चर्चा करा. कारण तुम्ही जे बोललात, ते दुसरी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने मांडण्याची शक्यता असते. समोरासमोर बोलण्याची सवय तुम्हाला अनेक अडचणींपासून वाचवते आणि लोकांनाही तुमची ही सवय आवडते.
विचारपूर्वक शेअर करा आपल्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी कुणीही मदत करू शकत नाही, हे सत्य तुम्हाला जितक्या लवकर समजेल तितके चांगले. सल्ला देऊ शकता. पण, तुमच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती इतरांना दिल्याने समस्या सुटणार नाही. एक धोकादेखील आहे की आपण ज्या व्यक्तीशी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत आहोत, ती तुम्ही सांगितलेले स्वत:पर्यंत सीमित ठेवेल, याची खात्री तुम्ही देऊ शकत नाही.
कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या येत असेल, तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा व्यवस्थापकाशी त्याबद्दल नक्कीच बोलू शकता. पण, ही बाब फक्त कार्यालयीन असावी. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नसावी. कधीही मत तयार करू नका तुम्ही ऑफिसमध्ये नवीन आहात किंवा कुणीतरी नवीन आले आहे, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल इतरांच्या म्हणण्यानुसार किंवा त्या व्यक्तीच्या देहबोलीनुसार मत बनवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपण ऑफिसमध्ये कामाला जातो, कुणाबाबत वैयक्तिक मत बनवण्यासाठी नाही. तुमचा सहकारी एखाद्याबद्दल आपले मत व्यक्त करत असेल, तर त्याची विचारसरणी आहे. अशा विचारसरणीची अंगीकार करु नका किंवा ती स्वतःची बनवू नका, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिच्याबाबतचे प्रत्येकाचे आकलनही वेगळे असू शकते. त्यामुळे असे मत बनवणे टाळून आनंदाने, उत्तम संघ म्हणून एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.