आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलाच्या भरती:पोलिस भरतीच्या प्रक्रियेत उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य असलेले इंजेक्शन व औषध (ऑक्सिबुस्टरची बॉटल) सापडले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. भरतीत प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी उत्तेजक द्रव्ये घेण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता, अशी माहिती उघड झाली आहे. या उमेदवाराचे अद्याप नाव स्पष्ट झाले नाही. मात्र, या तरुणाला भरतीतून अपात्र करून पुढील कारवाई केली आहे.

दि. २ जानेवारीपासून नांदेड पोलिस दलाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदरची प्रक्रिया ही दररोज सकाळी ५ वाजेपासून पोलिस मुख्यालय येथे सुरू होते. दि. ६ जानेवारी रोजी अंदाजे सकाळी सहा वाजताच्या सुमारास उमेदवाराचे अर्ज छाननी करून कागदपत्र तपासुन करण्यात आली. पुढील भरती प्रक्रिया करीता बायो मॅट्रीक चाचणी पुर्ण करुन करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना मुख्य ग्राऊंडमध्ये सोडण्याची प्रक्रिया चालू होती.

बातम्या आणखी आहेत...