आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:बाजाराला तुमच्या आरोग्यापेक्षा उपचार विकण्यातच अधिक रस

डॉ. चंद्रकांत लहारिया21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक लठ्ठ होण्याची वाट पाहणे आणि नंतर त्यांना त्यावरील उपायाची औषधे विकणे हा उपाय नाही, तर निरोगी जीवनशैली, व्यायाम इत्यादींना प्रोत्साहन देऊन लठ्ठपणा रोखणे हा उपाय आहे.

अलीकडे आलेल्या काही बातम्यांनी आपले लक्ष वेधून घेतले पाहिजे आणि आपल्याला आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले पाहिजे. हेल्थ ड्रिंक्स म्हणून विकल्या जाणाऱ्या अनेक पेयांमध्ये अतिरिक्त साखर आहे आणि ती आरोग्यास हानिकारक आहे, अशा प्रकारच्या त्या बातम्या होत्या. आणखी एका बातमीत होते की, लठ्ठपणाविरोधी औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यानंतर भारतात रेबीजच्या लसीचा तुटवडा असल्याची बातमी आली. हे सर्व चिंताजनक आहे.

घरी शिजवलेले आरोग्यदायी अन्न खाण्याऐवजी श्रीमंत व गरीब दोघेही हानिकारक व महागडे पॅकेज्ड व जंक फूड खरेदी करतात, हे खेदजनक व दुर्दैवी आहे. अशा अन्नामध्ये बरेचदा फॅट व साखर असते आणि ते आपल्याला लठ्ठ बनवतात. यामुळे स्पष्टपणे आपले आरोग्य एक वस्तू झाले आहे. आता आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांमुळे देशभरातील लोक लठ्ठ आणि आजारी होत असताना लठ्ठपणा बरा करणाऱ्या या नव्या औषधाची चर्चा आहे. ही बाजाराची रणनीती आहे की, आपल्या आरोग्यामध्ये स्वारस्य नाही, परंतु आपण आजारी पडल्यास आपल्याला उपचार विकू इच्छितो.

आज बाजारात भरमसाट ‘रेडी टू इट’ आणि इन्स्टंट फूड आहे. यापैकी बहुतांश आरोग्यासाठी हानिकारक आहेत. वस्तुत: या खाद्यपदार्थांची माहिती पॅकेजवर दिसावी, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या आत काय आहे हे कळू शकेल, ही आरोग्य तज्ज्ञांची मागणी उद्योगांकडून फेटाळण्यात येत आहे. ही हानिकारक अन्न उत्पादने बाजारात आल्याने मधुमेह व उच्च रक्तदाबाची विद्यमान आव्हाने दुप्पट होतील. काही खूप महागडी औषधे लठ्ठपणा चमत्कारिकरीत्या बरा करणारी औषधे आहेत. कर्करोग इत्यादींवर उपचार करणाऱ्या औषधांच्या गटात यांचा समावेश केला जात आहे. काही प्रकारचे कर्करोग टाळता येत नाहीत, परंतु लठ्ठपणा हा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे आणि बहुतांश प्रकरणांत तो टाळता येऊ शकतो, हे विसरले जाते. या औषधांचे साइड इफेक्ट्स असू शकतात आणि श्रीमंतांसाठीही ते विकत घेणे कठीण आहे.

कोविड-१९ महामारीने आधीच अस्तित्वात असलेले रोग व गंभीर आजार यांच्याशी संबंधित धोके प्रकाशात आणले आहेत. तरीही आरोग्य सेवांचे अति-वैद्यकीयीकरण हे एक मोठे आव्हान आहे. महामारीनंतर आरोग्यसेवेच्या वैद्यकीयीकरणाचा नवा व उदयोन्मुख चेहरा एप्रिल २०२१ पासून नवे दवाखाने व रुग्णालयांच्या रूपाने समोर आला. त्यांना रुग्ण बरे करायचे आहेत, पण रोग टाळण्यासाठी व लोकांच्या सुरक्षिततेबद्दल कोणीही सल्ला देऊ इच्छित नाही. ही समस्या प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देण्याऐवजी प्रतिजैविकांचे सेवन करण्याला व अनावश्यक शस्त्रक्रियांना प्राधान्य देणाऱ्या नागरिकांचीही आहे. पारंपरिक औषधांच्या नावाखाली सिद्ध न झालेल्या उपचारांना चालना दिल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. पारंपरिक ज्ञान प्रतिबंधाच्या पद्धती व निरोगी जीवनशैलीवर आधारित आहे.

भारतात कोविड-१९ हा सुमारे १० महिन्यांपासून स्थानिक महामारी झाला आहे. तरीही इन्फ्लुएन्झा विषाणूसारख्या श्वसनाच्या आजारात थोडीशी वाढ होऊनही आपण घाबरतो, त्याकडे आपण महामारीपूर्वी फारसे लक्ष दिले नव्हते. आता एक नागरिक म्हणून आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. निरोगी राहण्यासाठी आपल्याला बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज्ड, तथाकथित आरोग्यदायी अन्नावर अवलंबून राहण्याची गरज नाही. ना मुलांसाठी, ना मोठ्यांसाठी, ना इतर कोणासाठी. त्याचप्रमाणे रोगांवरील नवीन उपचारांबद्दल फारसे उत्साही होण्याची गरज नाही. यात आजारी पडण्याची वाट पाहणे आणि महागडी औषधे घेणे यावर लक्ष केंद्रित न करता रोगापासून बचाव करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्हाला तुमच्या आजाराची माहिती असेल तर कृपया त्यावर उपचार करा. तथापि, उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. सरकारने खाद्यपदार्थांच्या विक्रीवर प्रभावी नियामक उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) साखरयुक्त पेये आणि अधिक मीठ व चरबीच्या पदार्थांवर जास्त कर लावण्याची गरज आहे. डॉ. चंद्रकांत लहारिया प्रख्यात डाॅक्टर c.lahariya@gmail.com