आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्यापैकी किती लाेकांना याचा अनुभव अाला? तुम्ही जेव्हा चांगले कपडे घालून ऑफिसच्या मीटिंगमध्ये जाता तेव्हाच पत्नी मुलांना शाळेत सोडण्याचे सांगते. तुम्ही मन मारून जाण्यास तयार होता. आता शाळेत गेल्यावर तुम्ही गाडी थांबवता, पण गाडीतून उतरत नाहीत. मुले दार उघडतात अन् खाली उतरतात आणि तुम्हाला शाळेत शिक्षिकेला भेटण्यासाठी विनंती करतात. तुम्ही म्हणता आज नाही, आज मीटिंग आहे आणि निघून जाता. त्या वेळेस मुलांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया पाहण्यास तुम्हाला वेळ नसतो. कारण तुम्ही घाईत असता. ही एक नेहमीच प्रतिक्रिया असते. ही एक नेहमीच संमिश्र प्रतिक्रिया असते. मुलाला आनंद होतो की, त्याचे वडील आज खूप स्मार्ट दिसत आहेत, पण वडिलांकडे त्याला वर्गात सोडण्यासाठी वेळ नाही याचे दुःखही असते. वडील आले असते तर त्याच्या मित्रांवर चांगली छाप पडू शकली असती. अशा प्रकारे तुम्ही किती वेळेस अनुभव केले? तुम्ही दाढी नाही केली, बर्म्युडा आणि स्लीव्हलेस बनियनसारखा टी शर्ट घातलेले आहात, सकाळपासूनच कामाला उशीर होत आहे. कारण पूर्ण कुटुंब लेट-नाइट पार्टीत होते. तुम्ही आधीच ऑफिसला मेसेज पाठवला की, तुम्ही आजारी आहात. मात्र तुम्हाला मुलाला सोडण्यासाठी शाळेत जावे लागते. घाईत तुम्ही कपडे बदलणे विसरता आणि मुलांना टू व्हीलरवर सोडण्यासाठी जाता. कारण त्याला शाळेत उशीर होऊ नये म्हणून. तुम्ही सुटीवर असल्यामुळे मुलाला क्लासरूमपर्यंत जाण्याचा विचार करता. पण मुलगा म्हणतो, बाबा, तुम्ही शाळेत येऊ नका, मी एकटा जातो. कारण तुमचा पोशाख चांगला नसतो. मी मुंबईत अनेकदा पाहतो की, ज्यांना सकाळी ९ वाजता ऑफिस गाठावे लागते आणि तासाभराचा प्रवास करावा लागतो ते सहसा चांगले कपडे घातलेले असतात, तर ज्यांचे ऑफिस घरापासून २० मिनिटांपेक्षा कमी अंतरावर असते ते इतर प्रकारचे कपडे घालतात. कधी कधी आई नाइट ड्रेसमध्ये असतेे तर वडील स्लीव्हलेस आणि हाफ पँटमध्ये असतात. मी गेल्या आठवड्यात एका शाळा व्यवस्थापनाने पालकांना पाठवलेला संदेश वाचला. तेव्हा मला या वेगवेगळ्या परिस्थितीची आठवण झाली. त्यामुळे अहमदाबादमध्ये नवा वाद उद्््भवला. मोबाइलवर पाठवलेला मेसेज पुढीलप्रमाणे होता : ‘नमस्कार पालक, आम्हाला हे सांगायला आवडत नाही की, मुलांना साेडायला येताना तुमच्यापैकी काही चांगले कपडे घातलेले नसतात, काचणी नाइट गाऊन, पायजमा, शॉर्ट््स असे घालून येतात. हे सार्वजनिक ठिकाण आहे आणि तुम्ही चांगले कपडे घालून यावे ही विनंती. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.’ शाळेचा जेथे विषय येतो तेथे शाळा मुलांसाठी शिक्षणाचे मंदिर असते. तेथे देवी सरस्वती विराजमान असते. आपल्या येथे हीच मान्यता असते. शिक्षक मुलांना शिकवतात की, नेहमी शिस्तीत राहावे. प्रॉपर ड्रेस कोड याचाच एक भाग आहे.
फंडा असा की, पालकच चांगला पोशाख घालून शिक्षणाच्या मंदिराचा सन्मान करणार नाही तर कोण करेल ?
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.