आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठांजवळ बसणे म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून भूतकाळाकडे पाहणे. आपण आपला वेळ व्यवस्थापित करतो, त्यामध्ये तीन लोकांसाठी थोडा वेळ काढा - समवयस्क, छोटे आणि मोठे. वडीलधाऱ्यांजवळ थोडा वेळ नक्कीच बसावे. म्हातारी माणसं म्हणायची की, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांशी वाद घालू नये. यामागे सखोल कारण होते. आपल्याला वाद घालण्याची सवय लागली तर आपण मोठ्यांचे ऐकू शकणार नाही. आपण आपल्या घरातील ज्येष्ठांजवळ बसता तेव्हा त्यांचे फक्त ऐकावे. प्रत्येकाला एक दिवस म्हातारे व्हायचे आहे. पण, आजच्या शिक्षणामुळे आपल्यात एक वृत्ती जन्माला आली आहे आणि ती म्हणजे वाद घालण्याची वृत्ती. तर्क व वाद यात फरक आहे. तर्कात तरीही आदर राहतो, पण वादामुळे समोरच्या व्यक्तीचा अनादर होतो. आजकाल मुलं आई-वडिलांशी, नवरा-बायको एकमेकांशी खूप वाद घालतात. वाद हा एक प्रकारचा शब्दांचा हल्ला, शाब्दिक हिंसाचार आहे. आपण वाद घालतो तेव्हा त्यामागे चार गोष्टी काम करतात - निरुपयोगीपणा, मत्सर, आवेश आणि अहंकार. बोलणे हा अधिकार आहे, पण वादविवाद हा अत्याचार आहे. म्हणूनच तिन्ही वयोगटातील लोकांशी बोलताना अजिबात वाद घालू नका. ज्येष्ठांचे जास्तीत जास्त ऐकण्याची वृत्ती असेल तर जीवनाची काही रहस्यमय सूत्रे मोफत मिळतील.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.