आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:समस्यांचे छोट्या भागात विभाजन करून लोकांना सक्षम करावे

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आज प्रत्येक पेय कंपनी पाण्याच्या स्रोताजवळ कारखाना काढण्याचा प्रयत्न करत असताना वेगळा विचार करणारी एक व्यक्ती आहे. पेयांसाठी या देशातील प्रत्येक घरातील पेयजल का वापरू नये, ही त्यांची कल्पना होती.’ हे कौतुकाचे शब्द होते माझ्या वडिलांनी सहा दशकांपूर्वी सर्वांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या एका व्यावसायिक फ्लेव्हरिस्टबद्दल काढले होते. ते १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून प्रत्येक निम्न-मध्यमवर्गीय भारतीयांची तहान भागवत आहेत. वास्तवात त्यांच्या पेय युनिटने गोल्ड स्पॉट आणि मँगोला या स्थानिक भारतीय ब्रँड्सशी केवळ कठीण स्पर्धाच केली नाही, तर कोक आणि पेप्सीसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचाही धैर्याने सामना केला. पाणवठ्यांजवळ बॉटलिंग प्लांट लावणे, त्या बाटल्या वाहून नेणे आणि गोळा करून पुन्हा भरणे याची त्यांनी चिंता केली नाही. अजूनही त्यांच्या नावाचा अंदाज आला नसेल तर मी तुम्हाला एक लोकप्रिय टॅगलाइन सांगतो. ‘आय लव्ह यू रसना’ असे त्या काळी म्हणणारी ती मुलगी आठवते? ती केवळ गोंडसच नव्हती, तर तिने पूर्वीच्या अनेक मातांना स्वतःचे पेय बनवण्यात आणि बाळांना आनंद देण्यात मदत केली. रसनाचा एक पॅक पाच रुपयांना यायचा. आज त्याची किंमत १४० रुपये आहे, तरीही लाखो लोक ते वापरतात. अहमदाबादच्या या फर्मकडे आज विविध प्रकारचे स्प्रेड पोर्टफोलिओ आहेत.

दोन कारणांमुळे माझ्या लहानपणी क्रिकेट खेळल्यानंतर हे पेय प्यायल्याचे मला आठवते. या पेयाचे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी १९ नोव्हेंबरला निधन झाले. आणखी एक मनोरंजक कारण म्हणजे सध्या सुरू असलेला फिफा विश्वचषक मोठ्या स्क्रीनवर शांततेत पाहण्यासाठी केरळ फुटबॉल चाहत्यांनी घर विकत घेतले, त्याचे नूतनीकरण केले, मोठा टीव्ही लावला आणि सोमवारी संध्याकाळी इंग्लंड-इराण सामना आरामात पाहिला. यापूर्वी एर्नाकुलमचे हे १७ मित्र अनेक वर्षांपासून मोठे स्क्रीन लावून सामने पाहत होते आणि त्यासाठी ते जनरेटरही भाड्याने घेत होते, जेणेकरून ते शेड किंवा मोकळ्या जागेत एकत्र सामना पाहू शकतील. मात्र, काळाच्या ओघात या मोकळ्या जागा विकून त्यावर इमारती उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीत २०२२ चा विश्वचषक पाहणे कठीण झाले आहे. त्यानंतर या मित्रांना १३०० स्क्वेअर फुटांचे घर सापडले, त्याची किंमत २३ लाख रुपये आहे. प्रत्येकाने दीड लाख देऊन हे घर विकत घेऊन त्याचे नूतनीकरण करून घेतले. त्यांनी ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगालच्या रंगांनी भिंती रंगवल्या आणि नेमार, मेस्सी, रोनाल्डो यांसारख्या स्टार्सचे पोर्ट्रेट बनवले. त्यांनी तिथे मोठे स्क्रीन आणि स्पीकर लावले. ज्यांना सामना बघायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण कोणत्याही व्यत्ययाशिवाय खुले आहे. घराची नोंदणी सर्व १७ मित्रांच्या नावावर आहे. प्रत्येक शहरात पुस्तकप्रेमींसाठी लायब्ररी असते, त्याप्रमाणे फुटबॉल चाहत्यांसाठी ते कायमस्वरूपी ठिकाण बनवायचे आहे. संपूर्ण गाव फुटबॉलप्रेमी असल्याने हे ठिकाण फुटबॉल-लायब्ररीचेही काम करणार आहे. कदाचित आगामी काळात इतर खेळांसाठीही असेच उपाय योजले जावेत.

फंडा असा ः कोणतीही समस्या सोडवण्याचा संपूर्ण भार आपल्या मनावर घेण्याची गरज नाही. आपण समस्यांचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करून आणि सर्वांना मजबूत करूनदेखील त्या सोडवू शकता.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...