आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Even People With 6 Figure Salaries Are Waiting For Their Next Paycheck For Daily Expenses

​​​​​​​सर्व्हे:6 आकडी पगार असणारे लोकही रोजच्या खर्चासाठी आपला पुढचा पगार होण्याची वाट पाहत असतात

वॉशिंग्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी वेतन असणारे लोकच राेजच्या खर्चाबाबत अडचणींचा सामना करतात, असे काही नाही. उलट, ८० ते ९० लाख रु. दरमहा कमाई करणारे लोकही दैनंदिन खर्चासाठी दुसरा पगार होण्याची वाट पाहतात. नुकतेच स्मार्ट- अॅसेटद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. पाहणीनुसार, जगात वेगात वाढणाऱ्या महागाईचा परिणाम आता आकर्षक पगाराच्या लोकांवरही होत आहे. वित्त सल्लागार कंपनी स्मार्ट अॅसेटला अभ्यासात दिसले की, मोठ्या शहरांत ही स्थिती आणखी गंभीर झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पेमेंट आणि लेंडिंग क्लबच्या सर्व्हेत समोर आले होते की, ८९ लाख रुपयांहून अधिक कमाईच्या ५१% लोकांनी त्यांना मिळणाऱ्या वेतनातून रोजचा खर्च भागवत असल्याची माहिती दिली.

२०२१ मध्ये ४४% हाेता. सर्व्हेदरम्यान, अमेरिकासह ७६ सर्वात मोठ्या शहरांत कमाई करणाऱ्या लोकांच्या डेटाचा अभ्यास केला. यात दिसले की, अनेक प्रकारचे कर आणि राहणीमानावरील खर्चाच्या हिशेबाने न्यूयॉर्क सर्वात महाग शहर आहे. यानंतर होनोलूलू, हवाई, सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन डीसीमध्ये लाँग बीच आणि लॉस एंजिलिसचा समावेश आहे. भारतात नवी दिल्लीत राहणीमानावरील खर्च अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. याच पद्धतीने टेक्सास व ओक्लाहोमात मेम्फिस, टेनेसी, एल पासो, टेक्सास व ओक्लाहोमा शहराचा समावेश आहे.

श्रीमंताऐवजी उच्च मध्यमवर्गीय श्रेणीत ठेवले जाते ५६% अमेरिकींनुसार, दरवर्षी ८० लाख रु.पर्यंतची कमाई त्यांना श्रीमंत करेल. मात्र, सर्व्हेनुसार, त्यांना श्रीमंताऐवजी उच्च मध्यम वर्ग मानले जाते. काही शहरांत त्यांना लघु-मध्यम वर्ग मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...