आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगल्या आरोग्यासाठी साधारणपणे आठवड्यात १५० मिनिट हलका किंवा ७५ मिनिटांचा व्यायामाला आदर्श मानले गेले आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार, एका दिवसात जर १-१ मिनिटाचा थकवा येणारा व्यायाम केला तरी तो आरोग्यासाठी चांगला राहतो. आठवड्यात फक्त १५ मिनिट व्यायाम करणारे लोकदेखील दीर्घाआयुष्य जगू शकतात.
तीन मिनिटांचा व्यायाम म्हणजे वेगाने धावणे, सायकल चालवणे युरोपियन हार्ट जर्नलच्या मते, व्यायामात असा एक व्यायाम चांगला मानला जातो, त्यात व्यायाम करताना, श्वास घेताना बोलताही येत नाही. यात जोरात पळणे, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी), वेगवान सायकलिंग यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. जे लोक आठवड्यातून १५ मिनिटे जोरदार व्यायाम करतात, त्यांना कर्करोगाचा धोका १५ टक्के कमी असतो, असे एका जर्नलमध्ये आले आहे. त्याच वेळी, आठवड्यातून २० मिनिटे जोरदार व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका ४० टक्क्यांनी कमी होतो. तथापि, या व्यायामापूर्वी चांगला सराव करणे आवश्यक आहे.
व्यायामाची गती आणि लागणारा वेळ सर्वात जास्त महत्त्वाचा शारीरिक शिक्षणाचे सहायक प्रोफेसर स्टीफन जे कार्टर यांच्या मते, व्यायामाचा परिणाम त्याच्या गती आणि त्याला लागणाऱ्या वेळावरही अवलंबून आहे. उदाहरण म्हणजे ५ मिनिट वेगाने पळाल्याने शरीराला फायदा होतो तर ५ मिनिट हळू चालल्याने शरीराला काहीच फायदा होत नाही. वेगाने धावणे, जंपिंग जॅक, जंपिंग रोप इत्यादीमुळे हृदयाची पंपिंग क्षमता वाढते. व्यायामामध्ये दीर्घायुष्य प्रदान करणारे दोन घटक, पहिला व्यायाम करण्यासाठी आवश्यक असलेली ताकद आणि दुसरी एरोबिक क्षमता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.