आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Even When Families Are Divided, Teamwork Is The Key To Success |marathi News

यंग इंडिया:कुटुंबे विभक्त होत असली तरी सांघिक काम हेच यशाचे रहस्य

डॉ. प्रवीण झा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशात आणि जगात अशी कुटुंबे आहेत, अशी घरे आहेत ज्यात एकच व्यक्ती आहे. आइसलँडच्या वाळवंटापासून ते बंगळुरूच्या गर्दीपर्यंत अशी माणसे असतात. ती व्यक्ती घरातील सर्व कामे एकटीच करू शकते. दुसरीकडे, आता वन मॅन आर्मी असलेली कार्यस्थळे कमी आहेत.

रुग्णालयांपासून कटिंग सलूनपर्यंत आपल्याला एक टीम काम करताना दिसते. पूर्वी लोक डॉक्टरांकडे जाऊन मलेरियाचे औषध घेत असत. हर्नियाच्या ऑपरेशनपासून मुलाचा जन्मही त्याच डॉक्टरकडे होत असे. पण, जगातील आधुनिक रुग्णालयांमध्ये गेलात तर तिथे डझनभर डॉक्टर एकत्र येऊन शस्त्रक्रियेचे नियोजन करतात. सर्व स्कॅन केलेल्या प्रतिमांच्या मदतीने एक आभासी ऑपरेशन होत असते, असे व्हर्च्युअल रिअॅलिटी सॉफ्टवेअरच्या मदतीने शक्य आहे. अंतराळ सहलीचे नियोजन केले जात आहे, असे वाटते. आता ‘एकला चलो रे’ नव्हे, तर उत्तम टीम बनवून काम केले जात आहे.

टीम म्हणजे काय? उदा. ‘लगान’ चित्रपटातील भुवन ही व्यक्तिरेखा​​घ्या. तो चांगला खेळाडू होता, पण तो फिरकी टाकू शकत नव्हता, वेगवान गोलंदाजी करू शकत नव्हता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो एकटा खेळू शकत नव्हता. त्याने त्याच्यापेक्षा वेगळे गुण असलेले प्रतिभावान घेतले. सौरव गांगुलीने विविध क्षमता असलेल्या तरुणांना घेऊन एक संघ तयार केला.

आपण आपली सर्व मेहनत आणि प्रतिभा पणाला लावू शकतो, परंतु आपण अष्टभुजा नाही, सर्वकाही करू शकत नाही आणि परिपूर्णही नाही, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण काय चांगले करू शकतो हे ओळखले पाहिजे. आपण जे करू शकत नाही ते कोण चांगले करू शकेल? दोघे एकत्र आले तर किती छान होईल. दोनाचे चार. चारचे आठ. आठचे वीस.

अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी सापेक्षतेवर एक शोधनिबंध लिहिला तेव्हा त्यावर फक्त त्यांचे नाव होते. त्याच वेळी मानवाची जनुकीय कुंडली काढण्यासाठी ह्युमन जीनोम प्रकल्पाचे उदाहरण घेतले तर सात देशांतील वीस प्रयोगशाळांतील शेकडो शास्त्रज्ञ त्यात गुंतले होते. अनेक देशांतील शास्त्रज्ञांनी मिळून कोरोनाची लस तयार केली.

आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, गावात असो वा शहरात, शेती करत असो किंवा कोणतेही अत्याधुनिक तांत्रिक काम करत असो, आपल्याला सर्वोत्तम परिणाम देऊ शकणारी टीम शोधावी लागेल. आजच्या काळात आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून संपर्क करू शकतो. उदा. श्रीलंकेतील एका मच्छिमाराने शोधून काढले की, नॉर्वेजियन मच्छीमार सर्वात प्रगत आहेत. नॉर्वेजियन मच्छीमार वेगळ्या पद्धतीने काय करतात हे विचारणारे पत्र त्याने लिहिले. त्याने नॉर्वेला येऊन पाहिले आणि ज्ञान हस्तांतरित केले. परिणामी श्रीलंकेतील जाफनातील मत्स्य उत्पादन चांगले झाले.

अनेक दशकांपूर्वी सत्येंद्रनाथ बोस यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांना कलकत्त्याहून पत्र पाठवले होते. या पत्रातून जन्मलेल्या बोस-आइन्स्टाइन कंडेन्सेट सिद्धांताला तीन नोबेल पारितोषिके मिळाली! कदाचित त्यांनी ते एकट्याने केले असते, पण दोन डोकी एकत्र आल्यावर प्रवास जरा सोपा झाला. प्रत्येक सजग तरुणाने याच पद्धतीने आपले पूरक शोधून एक संघ तयार केला तर यशाचा मार्गाचे अंतर कमी होऊन तो आणखी चांगला होईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

बातम्या आणखी आहेत...