आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पेठ मोहल्ला भागातील विद्युत पोलवर लोंबकळणाऱ्या तारेबाबत एमएसईबी कार्यालयास निवेदन का दिले म्हणून घराबाहेर बोलवून घेत एकास मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेल्या नातलगांनाही तलवार, काठी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अन्वर मिस्कीन यांच्यासह १५ जणांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील पेठ मोहल्ला भागातील रहिवासी सय्यद वाजेद सय्यद सादेक हे ५ जानेवारी रोजी घरी थांबले असता रात्री आठ वाजता अन्वर मिस्कीन व इतरांनी हाकिम यांचे वेल्डींगच्या दुकानासमोर बोलवुन अन्वर मिस्कीन याने तू गल्लीतील लोकांना सोबत घेऊन एमएसईबी कार्यालयास गल्लीतील पोलवरील तारांबाबत निवेदन का दिलेस म्हणून शिवीगाळ केली.
जावेद मिस्कीन याने चापट मारली.अन्वर मिस्कीन याने सोबत असलेल्या शहाबाज इलियास सय्यद याच्या डोक्यात तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. या भांडणाचा आवाज ऐकून आलेल्या सय्यद खयुम, सय्यद हासन, सय्यद जावेर, सय्यद एजाज, सय्यद शहबाज यांना काठीने, लोखंडी गजाने मारहाण करीत व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अन्वर बाबु मिस्कीन, जावेद बाबु मिस्कीन, अन्सर बाबु मिस्कीन, इकबाल बाबु मिस्कीन, मसरत बाबू मिस्कीन, साखीब ईकबाल मिस्कीन, जैन इकबाल मिस्कीन, शेख हाकिम बालम व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.